धाराशिव न्यूज रिपोर्टर: विजय पिसे जळकोट
दि 8 ऑगस्ट 2025 रोजी श्री कुलस्वामिनी प्राथमिक माध्यमिक व राजर्षी शाहू कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय जळकोट च्या संयुक्त विद्यमाने भाऊ- बहिणीच्या ऋणानुबंधांना घट्ट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण असून, बंधुत्व व प्रेमाचे प्रतीक आहे.रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला . कार्यक्रमाची सुरुवात प्राथमिक आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका आशा पवार मॅडम यांच्या हस्ते वृक्षाला राखी बांधुन पर्यावरणाचा संवर्धनाचा संकल्प करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .
इयत्ता पहिली ते बारावी शाळेतील विद्यार्थिनींनी आश्रम शाळेतील मुलानां व शिक्षकांना राखी बांधून हा सण साजरा करण्यात आला. तसेच मुलांनी राखी बांधून मुलींना शैक्षणिक साहित्य भेट दिली
रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री कुलस्वामिनी माध्यमिक आश्रम शाळेचे ज्येष्ठ शिक्षक नागेंद्र गुरव सर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जगातील सर्वांत पवित्र नाते हे बहिण – भाऊचे असते भाऊ हा आई वडिलानंतर बहिणीसाठी जबाबदारी निभावणारा व्यक्ती असतो हाताला बांधलेल्या राखीचे ऋण भाऊ कधीही विसरत नाही बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी भावांनी विसरू नये असे सांगितले.
यावेळी मुख्याध्यापिका आशा पवार मॅडम, माध्यमिक आश्रम शाळेचे ज्येष्ठ शिक्षक नागेंद्र गुरव सर, प्राथमिक आश्रम शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्रीमती शांताबाई चौगुले मॅडम, श्रीमती मिरा पवार मॅडम, श्री खंडेराव कारले सर, किरण कांबळे सर महाविद्यालयाचे प्रा अप्पासाहेब साबळे, प्रा संतोष दुधभाते ,प्राध्यापिका प्रमिला कुंचगे, प्रा अश्विनी लबडे माध्यमिक आश्रम शाळेचे सहशिक्षक देवानंद पांढरे सर, किरण ढोले सर, बाळसाहेब मुखम सर
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बिळेणसिध्द हक्के सर,कल्पना लवंद मॅडम, कुमारी मयुरी कांबळे मॅडम, प्रा बालाजी राठोड सर ,दुर्गेश कदम सर, शंकर चव्हाण, अमित खारे आदींनी परिश्रम घेतले यावेळी आश्रम शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.