धाराशिव न्यूज रिपोर्टर : विजय पिसे जळकोट
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील समर्थ क्लासेसचा पालक मेळावा पार पडला. हा मेळावा केदारलिंग देवस्थान ट्रस्टच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते केदारलिंगाचे पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी शिवाजी कदम हे होते. या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून लातूर येथील आरसीसी कोचिंग क्लासेसचे प्राध्यापक प्रशांत सूर्यवंशी सर हे होते. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांचे चिरंजीव शैलेश भैय्या चाकुरकर हे होते. ते बोलताना म्हणाले की ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना घडविण्याचे मोठे कार्य समर्थ क्लासेसचे संचालक रामशेट्टी पाटील हे करत आहेत. त्यांचा कौशल्याचा फायदा सर्वजण करून घ्यावा . मानवाला जगताना शिक्षणा शिवाय पर्याय नाही असेही त्यांनी आवर्जून सांगितले .
यावेळी बाबुरावजी पाटील साहेब, माजी मुख्याध्यापक चंद्रकांत स्वामी सर, उद्योजक संगमेश्वर धरणे, माजी ग्रामपंचायत सदस्य अनिलजी छत्रे, पत्रकार विजय पिसे , अणदुर येथील पत्रकार शिवशंकर तिरगुळे ,सामाजिक कार्यकर्ते सदाशिव हासुरे,शिवानंद कारले, पालक सचिन कदम, बसवराज धरणे, महादेव जाधव, शिवराज कलशेट्टी, सुनील हासुरे, इलाई बागवान, बबलू पाटील, गजेंद्र चुंगे, संजय कडते, मारुती हब्बू ,सुभाष कुंभार, एकनाथ राठोड, सिद्धार्थ लोखंडे, चरणसिंग बायस व महिला पालक वर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.