धाराशिव न्यूज रिपोर्टर: विजय पिसे जळकोट
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे तालुक्याचे माजी आमदार शिक्षण महर्षी सिद्रामप्पा आलुरे गुरुजी यांच्या चौथ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ग्रामपंचायत जळकोट कार्यालयात झालेल्या अभिवादन कार्यक्रमात शिक्षण महर्षी आलूरे गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून करण्यात आले. यावेळी जळकोट गावचे सरपंच गजेंद्र कदम व मेघराज किलजे यांनी आलुरे गुरुजी च्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक कार्या विषयी उपस्थितांना माहिती सांगितली. यावेळी पत्रकार विजय पिसे, अनिल छत्रे, राजकुमार पाटील, अमोल आलुरे, गिरीश नवगिरे, लक्ष्मीकांत पाटील, सुदीप चौधरी, शेषराव कदम, लहू कागे, विवेक पिसे, ग्रामपंचायत कर्मचारी लहू कारले, विलास फुकटे, विशाल जाधव,नागनाथ स्वामी, लिंबाजी चंदे व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.