धाराशिव न्यूज रिपोर्टर: विजय पिसे जळकोट
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागा अंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई यांच्या अंतर्गत जिल्ह्यातील हुतात्मा वेदप्रकाश शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआय उमरगा येथे आधुनिक काळाच्या गरजेनुसार आधुनिक तंत्रज्ञानाचे दोन न्यू एज कोर्सेस यावर्षीच्या शैक्षणिक वर्ष 2025- 26 पासून सुरू होत आहे. ( 1) सोलार टेक्निशियन (2)मेकॅनिकल इलेक्ट्रिक व्हेईकल या दोन नवीन कोर्सला मान्यता मिळाली असून ज्या उमेदवारांनी प्रवेश घेतलेला आहे त्यांच्यासाठी व ज्यांना ऑप्शन बदलायचे आहे त्यांनी चौथ्या फेरीसाठी ऑप्शन बदलून ऑनलाइन प्रक्रियेमध्ये या दोन नवीन कोर्सेस साठी प्रवेश घेऊ शकता… मराठवाड्यातील सर्वात जास्त सूर्यप्रकाश असलेला जिल्हा म्हणून धाराशिव जिल्ह्याची ओळख असून याच धाराशिव जिल्ह्यात सोलार च्या माध्यमातून शेती ,शासकीय कार्यालय ,इमारती व घरावरती सोलार चे वाढते महत्व व उपयोग ओळखून तसेच प्रदूषण विरहित अशा इलेक्ट्रिक व्हेईकल या सध्या बाजारात खूप मागणी वाढलेली असून त्याच अनुषंगाने ग्रामीण भागातील गरीब ,होतकरू ,हुशार उमेदवारांना तांत्रिक कौशल्याद्वारे ज्ञान मिळवून देण्यासाठी डीजीटी नवी दिल्ली यांनी हुतात्मा वेदप्रकाश शासकीय आयटीआय उमरगा येथील ग्रीन चैनल द्वारे सोलार टेक्निशियन तसेच मेकॅनिकल इलेक्ट्रिक व्हेईकल या दोन व्यवसाया ला मान्यता दिली असून चौथ्या फेरीपासून याचे प्रवेश सुरू होत आहेत तरी इच्छुक ” उमेदवारांनी ऑनलाइन प्रक्रियेद्वारे पसंती क्रमांक निवडून दिनांक 28 जुलै ते दोन ऑगस्ट 2025 या कालावधीत आपल्या नजीकच्या शासकीय आयटीआय किंवा ऑनलाईन केंद्रावरून शासकीय आयटीआय उमरगा येथील या दोन न्यू एज कोर्सेस ला प्रवेश घ्यावा ,” असे आवाहन प्राचार्य श्री संजय माळकुंजे यांनी केले आहे.