राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सोलापुरात मोठा धक्का बसला आहे. सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांनी आपला राजीनामा थेट शिंदे यांच्याकडे सादर करत धक्का दिला आहे.
राजीनामा पत्रात सावंत यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. “सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची निवड मला विचारात न घेता केली गेली. माझ्या माढा तालुक्यातील तालुकाध्यक्ष व शहरप्रमुख यांचीही निवड परस्पर झाली, हे पक्षश्रेष्ठींचा माझ्यावर विश्वास नाही हेच दर्शवते,” असे त्यांनी नमूद केले आहे.
हा राजीनामा सोलापूर जिल्ह्यातील शिंदे गटासाठी खळबळजनक ठरला असून, येत्या काळात याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.