काटी/उमाजी गायकवाड
सोलापूर व धाराशिव जिल्ह्य़ाच्या सरहद्दीवरील व तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील आषाढ अमावस्या ते श्रावण नागपंचमी या पाच दिवस चाललेली नागोबा यात्रा गुरुवार दि. 24 आषाढ अमावस्या पासून सुरु झालेली नागोबा यात्रा मंगळवार दि. 29 नागपंचमी दिवशी हजारो भाविकांच्या उपस्थितीत, धार्मिक वातावरणात पार पडली. पाच दिवसांच्या यात्रा कालावधीत जिल्ह्य़ासह परजिल्ह्यतील हजारो भाविकांनी श्री नागोबाचे दर्शन घेतले. दुपारी साडेतीन पालखी मिरवणूक निघाली. यात्रा कालावधीत विशेष महत्व असणाऱ्या साप, पाल,विंचू या एकमेकांचे कट्टर हाडवैर्यांना एकत्र आल्याचे पाहण्यासाठी धाराशिव, लातूर, सोलापूर जिल्हातील अनेक ठिकाणांहून दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी लोटली होती होती. पंचमी दिवशी भाविकांनी दंडवत घालून सुवासिनीनी लाह्या आणि दुध, पुरण पोळीचा नैवेद्य दाखवून नागपंचमी साजरी केली. सावरगाव येथील नागोबा यात्रा यंदा गुरुवार ते मंगळवार या कालावधीत उत्साहात पार पडली.त्यानिमित्त गावकऱ्यांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील नागोबा यात्रेत गुरुवारी आषाढ अमावस्येदिवशी दुपारी साप, पाल,विंचू या उभयचर प्राण्यांचे मंदिर परिसरात दगडी शिळेखाली आगमन झाले होते. आजच्या काळात या यात्रेकडे सर्वधर्मसमभावाचे प्रतिक म्हणून पाहिले जाते.
हे तिन्ही प्राणी एकत्रीत सलग पाच दिवस राहिले. मंगळवार दि.29 नागपंचमी दिवशी यात्रेत खरगा, गण,भाकणूक,पालखी मिरवणूक असे विविध धार्मिक पार पडले.
सोमवार नागोबा यात्रेच्या चौथ्या दिवशी भावाच्या उपवासानिमित्त जवळपास 20 ते 25 हजार महिलांनी नागनाथ मंदिराजवळील वारुळाचे पूजन करुन बहीण -भावाच्या अतूट नात्याचा पांढरा धागा बांधून तेथेच उपवास सोडला. पेढा, मिठाई, उंच पाळणा, खेळण्याची दुकाने यांनी मंदीर परिसर गजबजून गेला होता. यंदा कर्नाटक मधील विजापूर येथील डॉल्स कला पथकांनी सादर केलेला पारंपरिक वेषभूषेतील देखावा सर्वांचे आकर्षण ठरले.
मंगळवारी नागपंचमी दिवशी पहाटे नागोबा मूर्तीस अभिषेक घालण्यास व नवसपुर्ती करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारी पुजारी सद्गुरू स्वामी यांची मंदीरापासून गण व पालखी मिरवणूकी 3:30 वाजता गाजत, नागनाथाच्या भजन जयघोषात टाळमृदंग, दिमडीच्या निनादात हनुमानकडे निघाली. हनुमान मंदीरात संचार झाल्यानंतर परत गण मिरवणूक नागनाथ मंदिराकडे निघाली असताना ठिकठिकाणी प्रत्येक सुवासिनींनी पाट टाकून व दारात रांगोळी काढून पालखीची पूजा करून दर्शन घेतले. मंदीरात मुख्य पुजारी सद्गुरू स्वामी यांना खरगाची मानकरी संजय कोळी यांनी अंगोळ घातली. सायंकाळी 6:30 वाजता मंदिराजवळ मिरवणूक आल्यानंतर तिथे महाआरतीने नागोबास ओवाळले गेले. त्यानंतर मंदिराशेजारी ओट्यावर भाकवणूक कार्यक्रम पार पडला. या भाकवणूकीत यंदा
ज्वारी, सोयाबीन, गहू, साळी, मिरची पीक जोरदार पिकेल व पाऊस समाधानकारक असेल असे भाकित सांगितले ़
गहु ज्वारी, हरभरा व सोयाबीन पिके चांगली येतील व पर्जन्यमान चांगले राहील असे मंदिराचे मुख्य पुजारी सद्गुरू स्वामी यांनी भाकित सांगितले.भाकवणूक कार्यक्रमानंतर महाआरती होऊन यात्रेची सांगता झाली.
चौकट..
या यात्रा कालावधीत भाविकांच्या स्वागतासाठी स्वागत कमानी, डिझीटल बॅनरने रस्ते फुलून गेले होते. तर ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच सुवर्णाताई पाटील, उपसरपंच धर्मराज शिंदे, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, माजी सरपंच रामेश्वर तोडकरी,माजी उपसरपंच आनंद बोबडे यांनी भाविकांना योग्य त्या सुविधा देण्यासाठी परिश्रम घेतले. तर तामलवाडी पोलिसांनी 60 पोलीस कर्मचारी व दोन अधिकाऱ्यांसह तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
यात्रा यशस्वी पार पाडण्यासाठी नागनाथ भजनी मंडळ व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.