धाराशिव ( सतीश राठोड ) :-
कारगिल युध्दात 1999 मध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानी घुसखोरांना परतून लावले मला कारगिल युद्धात सहभाग घेता आले युद्धातल सहभाग माझे भाग्य समजतो.पुढच्या पिढीला प्रेरणा देणं माझं कर्तव्य मानतो अशि प्रतिक्रीया खुदावाडीचे माजी सैनिक शिवाजी कबाडे यानी बोलताना केले.
अक्कलकोट येथिल लिड स्कूल शाळेत कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी प्रतिनिधिचा शपथविधी समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक शिवाजी कबाडे बोलत होते. एक दिवसीय शाळेची जबाबदारी मुला – मुलीकडे देण्यात आली तर हाऊस कॅप्टन व इतर जबाबदाऱ्या अधिकृतपणे देखील सोपवण्यात आल्या. शाळेच्या वतीने ” लिटल चॅम्पियन ” स्पर्धेत सहभाग नोंदवलेल्या शालेय विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रशस्तीपत्र देऊन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .यावेळी तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथील माजी सैनिक शिवाजी कबाडे यांचा कारगिल दिनानिमित्त सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अरविंद जाधव तर अध्यक्षस्थानी प्राचार्य कुमार मगदूम हे होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी मॅनेजर संजय आळगी सह शाळेतील शिक्षकांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन शोभा गोविंदे यानी केल्या तर आभार लक्ष्मीपुत्र होरपेटे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या नेतृत्वगुणांना चालना देणारा आणि त्यांच्या जबाबदारीची जाणीव निर्माण करणारा अशा या कार्यक्रमाची पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे .