अणदूर / प्रतिनिधी :-
तुळजापूर तालुक्यातील अणदुर येथे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान अंतर्गत बस स्थानकाची पाहणी करण्यासाठी परिवहन महामंडळ लातूर विभागाकडून करण्यात आली .
अणदुर एसटी बस स्थानकाची दुरावस्था असल्याची तक्रार वारंवार परिवहन महामंडळाकडे प्रवाशी वर्गातून केली जात होती.तसेच परिवहन विभागाकडून स्वच्छता अभियान अंतर्गत पथकाकडून पहाणी केली जात आहेत. पहाणी दरम्यान संबंधित आगार प्रमुखांना एस टी बस स्थानक परिसर स्वच्छतेबाबत सुचना करीत बस प्रवाशाच्या सोयी करीता सेवा द्यावी देण्याच्या सूचना केल्या .या पथकात महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन मंडळ लातूरचे विभागीय नियंत्रक अश्वजीत जानराव व प्रवीण राठोड यांनी बसस्थानक परिसराची पाहणी केली . त्याच बरोबर या अभियानात बस स्थानकातील स्वच्छतागृह, उडपी हॉटेल,तिकीट काउंटर व परिसरातील स्वच्छता याची देखील संबंधित पथकाकडून पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सुधारणा करण्याचे सूचना देण्यात आल्या.
यावेळी आगार प्रमुख रामचंद्र शिंदे, वाहतूक नियंत्रण राजकुमार चव्हाण, सेवानिवृत्त कर्मचारी सुरेश तोडकरी,बाळू गळाकाटे, बालाजी चव्हाण, प्रसाद शेट्टी, सचिन तोग्गी, स्वच्छतादूत भिमा गायकवाड आदी उपस्थित होते.