धाराशिव / प्रतिनिधी –
तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा स्पेशालिटी हॉस्पीटल आणि रिसर्च सेंटर नेरुळ, नवी मुंबई यांच्या यांच्यावतीने जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिराढोण ता. कळंब येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन शुक्रवार दि.२५ जुलै २०२५ करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. लातूर येथील दिशा फाउंडेशनच्या अध्यक्षा अँड.वैशालीताई लोंढे यांनी झाडे उपलब्ध करून दिली.
दिवसभर पाऊस सुरु असताना देखील या आरोग्य शिबीरास चांगला प्रतिसाद मिळाला. शिराढोण व परिसरातील सर्व वयोगटातील ५०७ महिला, पुरुष तसेच बालकांनी शिबिराचा लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला. गंभीर आजार असणाऱ्या काही रुग्णांवर मुंबई येथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली पुढील उपचार करण्यात येणार आहेत.
कार्यक्रमाचे उदघाटन तेरणा ट्रस्टचे जेष्ट विश्वस्त श्री.अशोक (भाऊ) शिंदे व श्री.विजय (आण्णा) चव्हाण यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रमुख पाहुने जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष श्री.पंडितराव टेकाळे, भाजपा कळंब तालुकाध्यक्ष श्री.दत्ता साळुंके, सरपंच श्रीमती लक्ष्मीताई म्हेत्रे, श्री.राजाभाऊ पाटील, माजी सरपंच श्री.पद्माकर पाटील, श्री.अनिल गायसमुद्रे, श्री.पवन म्हेत्रे, श्री.सुनील पांचाळ, श्री. सुरेश महाजन, श्री.राहुल माने, श्री.फसियोद्दीन काझी, श्री.समियोद्दीन काझी, श्री.बिभीषण पवार, श्री. सुनील शहाणे, श्री.दीपक शहाणे यांच्यासह गावातील प्रमुख कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते.
शिबिरात मुंबईचे तज्ज्ञ डॉ.अजित निळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच शिराढोण प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सय्यद, डॉ.कसपटे व केंद्राच्या आशा सेविकांचे सहकार्य लाभले.
सदरील शिबिराचे आयोजन आणि यशस्वीतेसाठी भाजपा तालुका उपाध्यक्ष तथा राणादादा युवा प्रतिष्ठानचे तालुका सचिव श्री.किरण पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष कष्ट घेतले.