spot_img
18.7 C
New York
Friday, August 1, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

शिवछञपती तरुण मंडळ गणेशोत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुरज जाधव तर उपाध्यक्षपदी प्रकाश पवार, प्रशांत लबडे यांची निवड

 

तुळजापूर प्रतिनिधी :-

तुळजापूर शहरातील शिव छञपती तरुण मंडळ गणेशोत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुरज जाधव तर उपाध्यक्षपदी प्रकाश पवार व प्रशांत लबडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

गेल्या अनेक वर्षांपासून शिव छञपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. यादरम्यान अनेक समाजपयोगी कार्यक्रम घेतले जातात.

माजी नगराध्यक्ष तथा समाजवादी पार्टीचे नेते देवानंद (भाऊ ) रोचकरी यांच्या मार्गदनाखाली तथा मंडळाचे आधारस्तंभ समाजवादी पार्टीचे युवा प्रदेशाध्यक्ष कृष्णा (भैय्या) रोचकरी व गणेश (दादा ) रोचकरी,रोहित (बॉस)पवार,संस्थापक अध्यक नितीन (दादा) घोलकर आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मंडळाच्या नुतन अध्यक्षपदी सुरज जाधव व उपाध्यक्षपदी प्रकाश पवार व प्रशांत लबडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच कोषाध्यक्षपदी रोहन पुजारी, सचिवपदी अनिरुध्द जाधव व श्रवण पुजारी तर मिरवणूक प्रमुखपदी संदीप (भैय्या ) चौगुले व पवन (भैय्या )सोनवणे यांची देखील यावेळी निवड करण्यात आली.

यावेळी गणेशोत्सव दरम्यान घेतले जाणाऱ्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीसाठी मंडळाचे मार्गदर्शक कृष्णा (भैय्या ) रोचकरी,गणेश (दादा ) रोचकरी रोहित पवार नितीन घोलकर,राहुल जाधव यांच्यासह मंडळातील सर्व सहकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या