धाराशिव ( सतीश राठोड ) :-
हरित धाराशिव अभियानांतर्गत “एक पेड मॉ के नाम ” वृक्ष लागवड मोहिमेत तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा येथे तीन हजार वर्षाची लागवड करण्यात आली असून येथील उमेद महिला बचत गटाच्या महिलांचा मोठा योगदान मिळाला आहे.
धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी 15 लाख वृक्षाची लागवड करण्याचे आवाहन केले होते . या आवाहनास प्रतिसाद देत येथील ग्रामपंचायत , महसूल , कृषी विभाग सह जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक , उमेद बचत गटातील अधिकारी यांनी पुढाकार घेऊन वृक्ष लागवड मोहिमेत राबविले आहेत. पर्यावरण संवर्धन आणि हरित क्षेत्र वाढवण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली आहे या उपक्रमात महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती चे उमेदचे जिल्हा समन्वयक गोरक्षनाथ भांगे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला . वनराईचे चांगले नंदनवन होण्यासाठी उमेद बचत गटातील सीआरपी केशरताई जाधवर व बचत गटातील महिलांनी परिश्रम घेतले या वृक्षाचे पालकत्व बचत गटातील महिलांनी घेतले आहे प्रशासकीय आदेश म्हणून नव्हे तर एक सामाजिक व पर्यावरणीय चळवळ म्हणून महिलांनी सहभाग नोंदवला तलाठी विशाल ननवरे व सीआरपी उमेदच्या केशर ताई जाधवर यांनी विशेष पुढाकार घेतले वृक्ष लागवड मोहीम कार्यक्रमात स्वरलता कराओकेचे प्रमुख सचिन ढेपे , सदस्य केशर जाधवर ( सीआरपी ) , भैरवनाथ कानडे यांनी बहारदार “वृक्षवल्ली आम्हा सोयरे ” या गीताचे सादरीकरण केले याप्रसंगी सरपंच सोनाली कानडे , उपसरपंच सुकेशनी मोठे ,ग्रामसेवक एस व्हि मैंदाड, कृषी सहाय्यक पी डी शिंदे , जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मक्तेदार , सचिन ढेपे , भैरवनाथ कानडे ,गरड सर ,भोईटे सर , श्री नामे सर , भिसे मॅडम ,पवार सर , सत्यवान गायकवाड , गरड सर , शशी सर , शाहुराजे गायकवाड , भैरवनाथ बेले सह
भैरवनाथ विद्यालयातील शिक्षक बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते .