spot_img
26.4 C
New York
Monday, July 21, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

खुदावाडी ग्राप नवीन इमारत बांधकामास मंजुरी..! सरपंच सरोजिनीताई कबाडे यांच्या पाठपुराव्याला यश

धाराशिव ( सतीश राठोड ) :-

राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत खुदावाडी ता तुळजापूर येथील नवीन ग्रामपंचायत इमारत बांधकामास शासनाकडून मंजुरी मिळाली असून सरपंच सरोजनीताई रेवणसिद्ध कबाडे व डॉक्टर शिवशंकर कबाडे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

केंद्र शासनाने पंचायती राज व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी ” राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान ” या योजनेचे पुनर्गठन करून ” राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान ” योजना शासनाने सुरू केली आहे . या योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायत इमारत बांधकाम मंजूरीचा प्रस्ताव पाठविण्यात आले होते .खुदावाडी ग्रामपंचायत इमारत धोकादायक व मोडकळीस आली होती .शासनाच्या विविध योजनेचा लाभ थेट गाव तांडा वाड्या वस्तीतील नागरिकापर्यंत पोहोचण्याकरिता ग्रामपंचायतच्या माध्यमातून सेवा देण्याकरीता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत होता . दिवसेंदिवस गावची लोकसंख्या वाढत आहे . ग्रामपंचायतीचा कामकाज व मासिक सभा घेण्याकरिता जागा अपुरी पडत होती यासह आनेक समस्या जाणवत होते हि बाब विचारात घेऊन ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज सुलभ होण्यासाठी सरपंच सरोजिनीताई रेवणसिद्ध कबाडे व उद्योजक डॉक्टर शिवशंकर कवाडे यांनी शासनाकडे नवीन ग्रामपंचायत इमारत बांधकाम करून मिळावे याकरिता प्रस्ताव पाठविले . याकामी शासनाकडे पाठपुरावा करून अखेर नवीन ग्रामपंचायत इमारत बांधकाम कामाची मंजूरी मिळविले . यामुळे आता ग्रामपंचायत कार्यालयात कामकाज पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांची गैरसोय दुर होणार आहे . ग्रामपंचायतीच्या गाव पुढाऱ्यांनी शासनाचे आभार व्यक्त केले असून ग्रामस्थातून समाधान व्यक्त होत आहे .

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या