spot_img
28.4 C
New York
Tuesday, July 22, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

काटी येथील भाजपच्या जनता दरबारात लोकांच्या विविध समस्यांचा निपटारा

 

काटी / प्रतिनिधी – (उमाजी गायकवाड)

तुळजापूर तालुक्यातील काटी येथे रविवार दि.20 रोजी सकाळी येथील निल कंठेश्वर मंदीरात भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या जनता दरबार या विशेष उपक्रमा अंतर्गत नागरिकांच्या राज्य व केंद्र शासनाच्या विविध विभागांच्या समस्यांचे निराकरण व त्यांच्या समस्या सोडवण्याच्या उद्देशाने आणि त्यांना थेट प्रशासकीय मदत मिळवून देणाऱ्या जनता दरबारात नागरिकांच्या विविध समस्यांचा निपटारा करण्यात आला.

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, भाजपचे तालुकाध्यक्ष महादेव जाधव यांच्या पुढाकाराने येथील कंठेश्वर मंदीरात आयोजित केलेल्या या जनता दरबारात अनेक लोकांनी सहभाग नोंदवत यामध्ये 88 लोकांनी विविध विभागाशी संबंधित लेखी तक्रारी नोंदवल्या. तसेच संकल्प ते शिद्दी अभियान अंतर्गत मोदी सरकारने गेल्या 11 वर्षामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी केलेली कामे याची माहिती लोकांना दिली तसेच आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून झालेली विकास कामे यांची माहिती नागरिकांना देण्यात आली. नागरिकांच्या विविध प्रकारच्या समस्या सोडविण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले.

यावेळी भाजप माजी जिल्हा अध्यक्ष अँड खंडेराव चौरे, जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख तालुकाध्यक्ष महादेव जाधव,राजकुमार पाटील,आदेश कोळी,रामहरी थोरबोले,चंद्रकांत काटे,किसानमोर्चाचे तालुकाध्यक्ष विजय निंबाळकर,तालुका सरचिटणीस बालाजी शिंदे, गोविंद हुलवणकर,तालुका उपाध्यक्ष मकरंद देशमुख,आबा सरडे, अनिल गुंड, दादा बेग,हेरार काझी,अशांत फंड आदी मान्यवरांसह काटी, वाणेवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य,उपसरपंच सोसायटीचे चेअरमन,संचालक व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या