वागदरी ( प्रतीनिधी):-
भारातीय जनता पार्टी सोशल मिडीया तालूकाप्रमुख तथा संयोजक पदी वागदरी ता. तुळजापूर येथील पत्रकार किशोर पांडूरंग धुमाळ यांची निवड करण्यात आली आहे.
लोकप्रिय आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब, माजी आमदार सुरजीतसिंग ठाकुर, भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी यांच्या मार्ग दर्शनाखाली भाजपा मंडळ अध्यक्ष नळदुर्ग ग्रामिण सौ. रंजना विलास राठोड यानी सदर निवडीचे पत्र किशोर धुमाळ याना दिले असुन त्यांच्या या सार्थ निवडी बडल वागदरी व परिसरातील भाजपा कार्यकर्ते, मित्र परिवारानी आभिनंदन केले आहे.



                                    
