spot_img
28.2 C
New York
Wednesday, July 16, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

नळदुर्ग ग्रामीण मंडळ भाजपा कार्यकारणी निवडी जाहीर

 

धाराशिव ( सतीश राठोड ) :-

भारतीय जनता पार्टी तुळजापूर विधानसभा अंतर्गत नळदुर्ग ग्रामीण मंडळाच्या विविध मोर्चा मंडळ अध्यक्ष – उपाध्यक्ष , कोषाध्यक्ष , सरचिटणीस- चिटणीस पदाच्या नुतन निवडी जाहीर करण्यात आले आहेत.

भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर , जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग ग्रामीण मंडळाच्या अध्यक्षा रंजनाताई विलास राठोड यांनी सदर निवडी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे निवडी जाहीर केली आहे . भाजपाच्या नळदुर्ग ग्रामीण मंडळ महिला मोर्चा मंडळ अध्यक्षपदी रेणुकाताई इंगोले लोहगाव, युवा मोर्चा मंडळ अध्यक्षपदी विक्रांत दुधाळकर आणदुर, किसान मोर्चा मंडळ अध्यक्षपदी अंगद जाधव बोळेगाव , ओबीसी मोर्चा मंडळ अध्यक्षपदी उमेश गोरे शहापूर , अल्पसंख्यांक मोर्चा मंडळाध्यक्षपदी फिरोज मुजावर इटकळ , अनुसूचित जाती मोर्चा मंडळ अध्यक्षपदी विठ्ठल घंटे निलेगाव तर भाजपा नळदुर्ग ग्रामीण मंडळ उपाध्यक्षपदी राधा मिटकर वागदरी , विवेकानंद मेलगिरी सिंदगाव , प्रवीण भोसले गंधोरा आदींची निवडी करण्यात आली . कोषाध्यक्षपदी नळदुर्ग ग्रामीण मंडळ वसंत रामा पवार जळकोटवाडी नळ याची निवड करण्यात आली आहे . सरचिटणीस पदी संजय मोटे चिकुंद्रा , पद्माकर जेवळे सराटी, सतीश काटे नंदगाव , ज्ञानेश्वर पाटील होर्टी, रेश्मा घंटे केशेगाव , किशोर सुरवसे वागदरी , गणेश सूर्यवंशी आणदुर, आदिती कुलकर्णी हंगरगा नळ , गौरी सालगे खुदावाडी आदी पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱी व कार्यकर्त्यातून अभिनंदन केले जात आहे.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या