spot_img
28.2 C
New York
Monday, July 14, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

उमरगा – लोहारा आमदार प्रवीणजी स्वामी यांच्या पाठपुराव्याला मोठे यश, उमरगा आगारात नवीन 5 बसेसचे आगमन

 

 

(परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे मानले आम.प्रवीण स्वामी व जनतेने आभर)

धाराशिव न्यूज रिपोर्टर: विजय पिसे जळकोट

 

धाराशिव जिल्ह्यातील उमरगा आगारात नवीन 5 बसेस नव्याने दाखल झाल्याने प्रवाश्याचीं गैरसोय टळणार आहे. याबाबत उमरगा – लोहारा तालुक्याचे सक्रिय आमदार प्रवीणजी स्वामी गेल्या अनेक दिवसापासून पत्राद्वारे व समक्ष परिवहन मंत्री यांची भेट घेऊन त्यांना जनतेच्या व प्रवाश्याच्या समस्या सांगितल्या आणि अखेर त्यांच्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे.
आमदार प्रवीणजी स्वामी यांनी वारंवार उमरगा – लोहारा तालुक्यातील जनतेला सर्वोच्च मानून त्यांच्या प्रश्नांची दखल घेऊन शासन दरबारी ते प्रश्न मांडून कमी कालावधीमध्ये कसे मार्गी लावतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमदार प्रवीणजी स्वामी हे होय.
उमरगा – लोहारा तालुक्यातील महिला प्रवासी, वृद्ध प्रवासी,विद्यार्थ्यांची गैरसोय आता टळणार आहे. यामुळे आमदार प्रवीणजी स्वामी यांचे जनता व प्रवाश्यांनी आभार मानले आहे, तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचेही आभार प्रवीणजी स्वामी व जनता मानले आहे.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या