येडशी / प्रतिनिधी :-
येडशी येथील श्री मारुती मंदिरामध्ये धर्मकार्य व सुसंस्कृती ,संस्कार तेवत राहावे यासाठी श्रीसंत वै रामकृष्ण भाऊ भगवान भाऊ,परमेश्वर महाराज आश्रम मंदिर व श्री मृदंगाचार्य जालिंदर बप्पा सस्ते वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीणे प्रत्येक शनिवारच्या दिवसी हारिपाठाचे नियोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे प्रथम पुजन सोहळा श्री परमेश्वर ( आण्णा ) पवार व गजानन भैय्या नलावडे यांच्या हास्ते करण्यात आला यावेळी श्रीहारी मेटे यांनी प्रस्ताविक केले .
याप्रसंगी मनोगत मांडताना श्री परमेश्वर (आण्णा ) पवार यांनी धर्मकार्यत येणाऱ्या आडी आडचणी सोडवण्यासाठी प्रखडपणे पुढे राहु.वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी वर्गाच्या सुविधा वाढण्यासाठी आग्रस्थानी राहाणार आसल्याचे म्हटले तर श्री हारी मेटे यांनी श्री संत वै (आश्रम ) संस्थान श्री महादेव सस्ते गुरुजी यांना परंपरा तेवत ठेवण्यासाठी कायम सोबत आसल्याचे सांगितले येडशी गावच्या संत परंपरेला होत आसलेली बादादुर करण्यसाठी आर्थिक व धार्मिक घडी बसवण्यासाठी केलेले परिश्रम व आज रोजी निर्माण होणाऱ्या घडामोडी आपल्य विचारातून मांडल्या तर श्री गजानन (भैय्या ) नलावडे यांनी हे कार्य अखंडपणे तेवत राहण्यासाठी येणाऱ्या आर्थिक व वस्तु स्वरूपातील कार्य करण्यासाठी आग्रस्थाई आसल्याचे संगीतले तर बाळासाहेब पवार यांनी येथील सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जातील आसे आश्वासन दिले तर शाम कदम सर यांनी सामाजिक दृष्ट्या या उपक्रमाची गरज आसल्याचे सांगितले यामुळे संस्कृती टिकून राहुन समाजासाठी आदर्श ठरणारी आहे .यावेळी बाजीराव देशमुख ,दादा जगताप,आवधुत पैहेलवान ,किरण देशमुख बालाजी नकाते,महादेव सस्ते गुरुजी व विद्यार्थी वर्ग व
ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले .या स्तुत्य उपक्रमाचे परिसरातील व्यवसाईक व भाविक भक्तातुन कौतुक होत आहे .
- Advertisement -