spot_img
25 C
New York
Monday, July 14, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

महाविद्यालयीन शिक्षणानंतर मुलीनी स्वावलंबी बनावे – पोलीस निरीक्षक यादव  नळदुर्ग पोलिसाकडून विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर

 

धाराशिव ( सतीश राठोड ) :-

महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायदा हे एक साधन आहे या कायद्याच्या माध्यमातून महिलांना सुरक्षेची हमी मिळणार आहे पीडित महिलांच्या बाबतीत तत्काळ दखल घेत सक्षम तपास आणि कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे अशी प्रतिक्रिया नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन यादव यांनी बोलताना केले .

तुळजापूर तालुक्यात आलियाबाद जळकोट येथिल श्री कुलस्वामिनी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा व राजश्री शाहू कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय जळकोट येथे नळदुर्ग पोलीस ठाणे अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी व्यासपीठावर बोलताना पोलीस निरीक्षक सचिन यादव बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य संतोष चव्हाण हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस नितीन राठोड , नागेंद्र गुरव , खंडेराव कारले ,प्रा संतोष दुधभाते, अभिजीत चव्हाण देवानंद पांढरे, हाक्के, ढोले किरण, श्रीम लबडे मॅडम , श्रीम कांबळे मॅडम श्रीम लवंद मॅडम श्रीम चौगुले मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती . याप्रसंगी महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य संतोष चव्हाण यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन यादव यांचा यथोचित सन्मान केला. पुढे बोलताना पोलीस निरीक्षक सचिन यादव म्हणाले की , छेड काढणाऱ्या टवाळखोराना बळी न पडता स्वतःचे संरक्षण कसे करावे महिला विषयक कायद्याचा उपयोग कसा करावा याबाबत सविस्तर माहिती दिली . महाविद्यालयीन शिक्षणानंतर मुलीनी स्वावलंबी बनावे महिलांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाने अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत मुलींनी धाडस व मनोधैर्य वाढवणे काळाची गरज आहे असेही शेवटी बोलताना केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सुरेश कोकाटे यांनी केले तर आभार बाळासाहेब मुखम यांनी मानले.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या