धाराशिव न्यूज रिपोर्टर:- विजय पिसे
भारतीय जनता पार्टीचे तुळजापूर पंचायत समिती सभापती आशिष दादा सोनटक्के यांच्या जळकोट येथील कार्यालयात मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रिपाई आठवले पक्षाच्या तालुका अध्यक्षपदी अरुणजी लोखंडे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल व भारतीय जनता पार्टीचे तांडा सुधार योजनेचे सदस्य श्री विलासजी राठोड वाढदिवसा निमित्त
तसेच मुरूम येतील बसव प्रतिष्ठानचे डॉक्टर रामलिंग पुराने यांना श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट येथे”गुणीजण गौरव”पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने त्यांच्या ही सत्कार गणेश दादा मित्र मंडळ जळकोट व पत्रकार विजय पिसे यांच्या वतीने शाल, फेटा, पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. यावेळी तुळजापूर पंचायत समिती सभापती आशिष दादा सोनटक्के, तंटामुक्ती अध्यक्ष यशवंत भाऊ कदम, पत्रकार मेघराज किलजे, नागनाथ किलजे, बाळासाहेब पाटील, हनुमंत अंगुले, शरद भोसले, मनोज चौधरी, माजी सरपंच तमन्नाप्पा माळगे, नागनाथ गव्हाणे, सदाशिव हासुरे, ज्ञानबा कदम, इराण्णा सोनें, मंगेश सुरवसे, बालाजी पालम पल्ले, दत्ता पांचाळ, अरविंद लोखंडे, अरुण पांचाळ, करण भोगे, राम जाधव व सोनटक्के मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.