spot_img
6.7 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img
spot_img

११ वी प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांची आर्थिक लूट थांबवावी – युवासेना तालुका प्रमुख राकेश सूर्यवंशी

 

धाराशिव / प्रतिनिधी :-

इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांची खोटी माहिती देऊन आर्थिक लूट केली जात असल्याचे वृत्त दैनिक आरंभ मराठीने बुधवारच्या (दि.९) अंकात दिले होते. याच वृत्ताचा दाखल देऊन युवासेनेचे शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन देऊन विद्यार्थ्यांची लूट थांबवण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली. ११ वी प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाइन प्रणालीमध्ये पारदर्शकतेचा अभाव असून विद्यार्थ्यांकडून अवाजवी शुल्क आकारले जात असल्याचा आरोप करत युवासेनेने शुक्रवारी (दि.११) धाराशिव जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले. युवासेनेचे तालुका प्रमुख राकेश सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची केंद्रीय ऑनलाइन प्रणाली ही विद्यार्थ्यांसाठी पारदर्शक व सुलभ असायला हवी होती. मात्र, अनेक महाविद्यालयांनी या प्रणालीचा गैरवापर करत, प्रवेश अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्यांना ११ वीच्या प्रवेशासाठी स्वतंत्रपणे ३ हजार ते १२ हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारले आहे. युवासेनेने यावर रोष व्यक्त करत म्हटले आहे की, विद्यार्थ्यांना अगोदरच फॉर्म भरताना आवश्यक सर्व माहिती ऑनलाइन पोर्टलवर दिली जाते. त्यानंतरही कॉलेज प्रशासन त्याच माहितीच्या आधारे पुन्हा प्रवेशासाठी वेगळ्या अर्जाची मागणी करत आहे. या अर्जाच्या नावाखाली हजारोंचा आर्थिक भुर्दंड लावला जातोय. ही विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आणि आर्थिक शोषण करणारी पद्धत असून, यामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाते आहे. त्यामुळे तातडीने या पोर्टलवर आधारित महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. याप्रकरणी योग्य ती कार्यवाही न झाल्यास युवासेनेच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी युवासेना तालुका प्रमुख राकेश सूर्यवंशी, संकेत सुर्यवंशी, अविनाश शेरखाने, सावन देवगिरे ,राहुल सिरसाठे सर, सिद्दीक तांबोळी, राकेश कचरे, दत्तात्रय सुर्यवंशी, लखन सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या