धाराशिव न्युज रिपोर्टर :- विजय पिसे जळकोट
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो वी, गुरुर साक्षात परब्रम्ह, तस्मे श्री गुरुवे नमः !!! याप्रमाणे भारतीय संस्कृतीमध्ये गुरुचे स्थान आढळ आहे. म्हणून प्रशाला जळकोट येथील विद्यार्थ्यांनी स्वहाताने भेटकार्ड व पुष्पगुच्छ तयार करून सर्व शिक्षकांना सन्मानित केले. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मनोगता मधून शिक्षकाप्रती प्रेम आदरभाव व्यक्त करत गुरुचे प्रत्येकाच्या जीवनातील महत्व पटवून सांगितले. इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या पुढील विद्यार्थ्यांनी भाषणे केली – वीरेन कदम, अभय मुडबे, वैष्णवी शिंदे, सिद्धेश्वरी कुंभार गणश्री मुडबे, श्रुती कांबळे, प्राची सुरवसे.
पुष्पलता कांबळे मॅडम यांनी जीवनात प्रत्येक स्तरावर ज्ञान देणाऱ्या सर्वांना धन्यवाद दिले. या कार्यक्रम प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सारणे संतोष शाळेतील शिक्षक पुष्पलता कांबळे, जयराम शिंदे, पुरंत , समाधान पवार वैष्णवी कदम, आरती सूरवसे, मडोळे सर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सलोनी चंदे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रावणी साखरे, जाधव तर आभार प्रदर्शन सानिका हासुरे हिने मानले.