जळकोट, दि.७(मेघराज किलजे) :-
तुळजापूर तालुक्यातील जळकोट परिसरातील विविध गावातील शालेय विद्यार्थ्यांना टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याच्यावतीने एक हजार छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
टायगर ग्रुप हा राज्य पातळीवर काम करणारी सामाजिक संघटना आहे. सामाजिक बांधिलकी जपून टायगर ग्रुपने आत्तापर्यंत विविध उपक्रम राज्यभरात राबवले आहेत. गेल्या वर्षी शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले होते. दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून समाजाच्या सामाजिक उपक्रमात टायगर ग्रुप सहभागी होत असतो. यावर्षी टायगर ग्रुपच्यावतीने जळकोट परिसरातील होर्टी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नंदगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हंगरगा (नळ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोरगाव (तुपाचे ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व जळकोटवाडी ( नळ) येथील इंदिरा काळे प्रशाला व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या १००० विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी टायगर ग्रुपचे पुणे विभागाचे कार्याध्यक्ष अभिजीत पवार, पुणे जिल्ह्याचे अनिकेत घुले, पिंपरी चिंचवड शहरचे अमोल रावळकर, पुण्याचे युवा उद्योजक ओमकार बुरसे – पाटील, संदीप मस्के, अजय चव्हाण, आदेश सोनवणे, धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष हर्ष भरोसे, जवाहर बालमंचचे धाराशिव जिल्ह्याचे मुख्य समन्वयक मुकेश सोनकांबळे, चैतन्य सगर, अमोल सगर, राज भंडारे, कैफ जमादार, महेश बलसुरे, अभिजीत काका, विविध शाळेचे मुख्याध्यापक, सहशिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थी उपस्थित होते. समाजातील गोरगरिबापर्यंत टायगर ग्रुप सध्या काम करत आहे. भविष्यातही ग्रुपच्यावतीने समाज उपयोगी कार्यक्रम हाती घेण्यात येतील असे टायगर ग्रुपचे अभिजीत पवार यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.