spot_img
26.6 C
New York
Thursday, July 31, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

पालिकेच्या आवारात मनसे-शिवसेनेचे एकत्र घंटानाद आंदोलन

 

धाराशिव न्यूज रिपोर्टर: विजय पिसे जळकोट

नळदुर्ग येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना (ठाकरे गट)च्या वतीने
30 जून सोमवार रोजी,सकाळी १०:३० वा.नगर पालिकेच्या आवारात पालिका प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी शहरातील
प्रमुख मागण्यासाठी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येत,निदर्शने दाखवत आंदोलन करण्यात आले,बसवसृष्टीचे काम सुरु कधी होणार?शहरातील हुतात्मा स्मारकांना गतवैभव प्राप्त कधी होणार?शहरातील मिरवणूक मार्गाची चाळण झाली आहे,रस्ता कधी होणार?महिलांसाठी बाजार लाईन येथे स्वच्छतागृह कधी होणार?आदी विषयावर पालिकेला जाग आणण्याकरिता मनसे-शिवसेना(ठाकरे)एकत्र येऊन निदर्शने दाखवत घंटानाद आंदोलन करून निवेदन दिले,यावेळी माजी नगरसेवक कमलाकर चव्हाण,मनसेचे जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार,शिवसेना शहरप्रमुख संतोष पुदाले,मनसे शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,मनविसे तालुकाध्यक्ष सूरज चव्हाण,विभाग अध्यक्ष गणेश बिराजदार,शिवसेनेचे शाम कणकधर,युवासेना उपतालुकाप्रमुख रोहन पाटील,सोमनाथ म्हेत्रे,नेताजी महाबोले,मनसेचे शिरीष डुकरे,विभागध्यक्ष योगेश मुदगडे,सोमेश्वर आलूरे,संदीप वैद्य रुपेश आलूरे मनसैनिक, शिवसैनिक उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या