धाराशिव प्रतिनिधी :-
दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, धाराशिव नगर पालिकेमध्ये मागील अडीच वर्षापासुन प्रशासकाची नेमणुक झाली आहे. या नगरपालिकेचा कारभार मुख्याधिकारी म्हणून वसुधा फड पाहत आहेत. फड यांनी शासनाने दिलेला विकास कामाचा निधी वेळेत खर्च केला नाही. त्यामुळे शहरातील रस्ते, नाल्या, उद्याने, पथदिवे यांची अवस्था न पाहण्यासारखी झाली आहे. या सर्व गोष्टींचा शहरवासीयांना शारिरीक, मानसिक आणि आर्थिक त्रास मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे.
धाराशिव शहरातील सर्व रस्ते खड्डेमय झाले आहेत. या रस्त्यांची वेळोवेळी दुरुस्ती मुख्याधिकाऱ्यांनी केली नाही. त्यामुळे शहरात वाहतुक कोंडी, अपघात, किरकोळ भांडणे, होत आहे.राज्यसरकारने रस्ते निर्मीती साठी निधी देवुन सुध्दा मुख्याधिकाऱ्यांनी वेळीच निर्णय न घेतल्याने शहरात अजूनही रस्ते झाले नाहीत.
शहरातील नाल्यांची दुरुस्ती न केल्याने अनेक भागात सांडपाणी रस्त्यावरुन वाहु लागले आहेत.संपूर्ण शहरात दुर्गंधी पसरली असून नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शहरातील पथदिवे अनेक महिन्यांपासून बंद पडले आहेत. त्यामुळे संपूर्ण शहर अंधकारमय झाले आहे. यामुळे नागरीक भयभीत असुन चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शहरातील कच-याची व्यवस्थापन यंत्रणा पुर्णपणे कोलमडून गेले आहे. शहरात विविध भागात कचऱ्याचे ढिग साचले असुन त्यामुळे रोगराई आणि मोकाट जनावरांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. मोकाट जनावरां वरती कारवाई न केल्याने अनेक नागरीक जखमी झाले आहेत.
शहरातील सार्वजनिक स्वच्छता गृहांची संख्या कमी असून जे आहेत ते अत्यंत अस्वच्छ आणि देखभाल शुन्य आहेत. शहरातील सार्वजनीक उद्यानांची अवस्था दयनिय झाली आहे. उद्यानांमध्ये मोठ्या प्रमाणात निरुपयोगी झाडे झुडपे, तुटलेली खेळणी ,पडलेले कुंपन यामुळे नागरीक आणि बालकांना करमणुकीसाठी जागा उरलेली नाही.
धाराशिव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांनी भ्रष्टाचाराच्या आलेल्या तक्रारीवर कुठलीही कार्यवाही न करता कर्मचाऱ्यांना पाठीशी घातले. तसेच राज्यशासनाने दिलेल्या आदेशांचे पालनही केले आहे. मुख्याधिकारी फड यांच्या निष्क्रीय कारभारामुळे नगरपालिकेच्या कारभाराचे तीन – तेरा वाजले आहेत.
या सर्व गोष्टीस नगरपालिकेच्या प्रमुख या नात्याने वसुधा फड यांची निष्क्रीयता, हलगर्जीपणा, दुर्लक्षपणा केल्यामुळे जवाबदार आहेत. फड यांना बडतर्फ करुन त्यांची विभागीय आयुक्त स्तरावर चौकशी करुन त्यांच्यावर कडक कार्यवाही करावी.कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आरपीआय (डे) च्या वतीने देण्यात आला आहे.
या निवेदनावर आरपीआय (डे) चे जिल्हा संपर्क प्रमुख राज धज, अनिल वाघमारे, भोसले कृष्णा, कौतुक माने, अजय माने, आदींच्या सह्या आहेत.