अणदूर / प्रतिनिधी :-
तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथील संत तुकाराम सामाजिक संस्थेच्या वतीने अणदूर येथील जि प प्रा शाळा वत्सलानगर येथील गुणवंत शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अणदूर तंटामुक्त समितीचे सदस्य, माजी ग्रामपंचायत सदस्य अरविंद गायकवाड, प्रमुख पाहुणे म्हणून जवाहर महाविद्यालयातील डॉ.मल्लीनाथ बिराजदार, मुख्याध्यापक सुरेखा दराडे,ग्रा पं सदस्या अनुसया कांबळे, जेष्ठ नागरिक बाबुराव हागलगुंडे, पोलीस पाटील जावेद शेख, अणदूरकर सामाजिक संस्थेचे संस्थापक अजय अणदूरकर,संत तुकाराम सामाजिक संस्थेच्या संचालिका अनिता काळुंके,सेवानिवृत्त बॅंक शाखाधिकारी भानुदास सुरवसे, डॉ.प्रसन्न कंदले सर,शालेय व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष सोमनाथ लंगडे,यांची प्रमुख उपस्थिती होती.
——————————————————-
यावेळी संत तुकाराम सामाजिक संस्थेच्या वतीने जि प प्रा शाळा वत्सलानगर येथील शिवदास भागवत यांनी नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षा हे पुस्तक निर्माण केल्याने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला तर शाळेची गुणवत्ता वाढीसाठी मुख्याध्यापिका सुरेखा दराडे,एस बी स्वामी,बि बि पांचाळ,व्ही व्ही आडम,व्हि आर खलाटे,डि आर आरदवाड,एस डि गीरी,बि बि घोडके, पल्लवी लंगडे, गणेश नन्नवरे या शिक्षक कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
——————————————————-
यावेळी डॉ एम बी बिराजदार,सुरेखा दराडे, वृक्ष मित्र,पत्रकार शिवशंकर तिरगुळे,डॉ प्रसन्न कंदले, लेखक शिवदास भागवत यांनी मार्गदर्शन केले
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संत तुकाराम सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा धाराशिव जिल्हा बालकल्याण समीतीचे सदस्य दयानंद काळुंके यांनी केले, सुत्रसंचलन माजी सरपंच प्रबोध कांबळे यांनी तर आभार यांनी डी आर आरदवाड सर मानले.
यासाठी शिवशंकर तिरगुळे,सचिन तोग्गी,संजीव आलूरे,चंद्रकांत मुळे, सिकंदर शेख,आण्णाराव चव्हाण,यांच्यासह संत तुकाराम सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व सायंकाळ मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
- Advertisement -