धाराशिव न्यूज रिपोर्टर: विजय पिसे जळकोट
दिनांक 26 जून 2025 रोजी श्री कुलस्वामिनी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा जळकोट ता. तुळजापूर जि.धाराशिव . येथे “छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात आली.
*या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. संतोष चव्हाण साहेब,प्रमुख पाहुणे श्री कुलस्वामिनी प्राथमिक आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती आशा पवार मॅडम,श्री कुलस्वामिनी माध्यमिक आश्रम शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री नागेंद्र गुरव सर तसेच श्री कुलस्वामिनी प्राथमिक आश्रम शाळेचे ज्येष्ठ शिक्षक खंडेराव कारले सर उपस्थित होते.*
*कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.*
*तसेच छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून जळकोट येथील पत्रकार मेघराज किलजे यांची सुकन्या डॉ राजलक्ष्मी मेघराज किलजे यांनी अत्यंत कठिण परिस्थितीवर मात करून Neet परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल तिचा विद्यालयाच्या वतीने प्राचार्य संतोष चव्हाण साहेब यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सुरेश कोकाटे सरांनी केले यावेळी कुलस्वामिनी आश्रम शाळेतील उर्मिला चव्हाण, कावेरी राठोड, शुभांगी कवठे, राठोड साक्षी या विद्यार्थिनी छत्रपती शाहू महाराज यांच्या विषयी भाषण केले*
*या दिनाचे औचित्य साधून शाळेत भाषण स्पर्धा,निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.तसेच नागेंद्र गुरव सरांनी विद्यार्थ्यांना यशवंत होण्यासाठी मार्गदर्शन केले.*
*तसेच घर घर संविधान या मोहिमे अंतर्गत -“विद्यार्थ्यांना भारतीय संविधानातील प्रमुख प्रकरणे,हक्क आणि कर्तव्य” या बद्दल श्री प्राचार्य संतोष चव्हाण साहेब यांनी माहिती सांगून मार्गदर्शन केले.*
*या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन . किरण कांबळे यांनी केले व उपस्थितांचेआभार श्री बिळेणसिद्ध हक्के यांनी मानले यावेळी आश्रम शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते*