spot_img
26.5 C
New York
Thursday, July 31, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

अणदूर( वत्सलानगर ) येथील हभप.डॉ. विष्णुपंत मुंढे यांच्या निवासस्थानी पार पडली बैठक

सत्संग संतांचा पंधरवडा बैठकीस राम भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

इटकळ (दिनेश सलगरे):-

 

ग्रामीण भागातील सर्व सामान्य माणसाना अध्यात्म ज्ञान म्हणजे काय, आपल्या जीवनात आपण काय करावं व काय करू नये , रामायण,महाभारत ज्ञानेश्वरी , भगवद गीता आदि ग्रंथांची माहिती व्हावी व समाजामध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे हा उद्देश ठेऊन अणदूर येथील रामभक्त कीर्तनकार डॉ.विष्णुपंत मुंढे व रामभक्त सिद्राम सोमवसे यांच्या संकल्पनेतून पंधरवडा सत्संग बैठकीचे आयोजन करण्यात आले.
या सत्संगाची पाहिली बैठक रामभक्त सिद्राम सोमवसे यांच्या निवासस्थानी तर दुसरी बैठक रामभक्त श्रीमंत घुगे यांच्या निवासस्थानी झाली. आणि या सत्संगाची तिसरी बैठक नुकतीच रामभक्त हभप. डॉ. विष्णुपंत मुंढे यांच्या निवासस्थानी रविवार दि.२२ जून रोजी सकाळी ११ ते १ या दरम्यान पार पडली.हभप.डॉ. विष्णुपंत मुंढे महाराज यांच्या नेतृत्वाखाली या तिसऱ्या सत्संग बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या सुरुवातीस हभप.अशोकराव जाधव गुरुजी बाभळगावकर यांच्या यांच्या हस्ते ज्ञानेश्वरी ग्रंथाचे व विठ्ठल रुक्मिणी मूर्तींचे पूजन करण्यात आले.यानंतर डॉक्टर मुंडे महाराज यांनी सर्व राम भक्तांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. ह.भ.प. रामभक्त दिनेश सलगरे यांनी उपस्थितांना कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली व प्रत्येक राम भक्तांना निरूपण करण्यासाठी विषय वाटून दिले यामध्ये ह.भ.प. अशोकराव जाधव गुरुजी यांना संतांचे लक्षणे हा विषय देण्यात आला यावेळी जाधव गुरुजी यांनी संतांची लक्षणे निरूपनाच्या माध्यमातून व्यक्त केले. ह भ.प.शिवाजी महाराज चव्हाण यांनी स्वस्वरुपाची तर हभप. रामभक्त दिनेश सलगरे यांनी राम अवताराचे रहस्य सांगितले.
सर्वच उपस्थित राम भक्तांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला. हभप.दगडु जोडभावे सर यांनी ग्रंथ वाचनाचे महत्त्व सांगितले सर्वांनीच आपआपल्या परीने विचार व्यक्त केले. शेवटी ह.भप. डॉ. विष्णुपंत मुंढे यांनी समारोप करून सर्वांचे आभार मानले.या कार्यक्रमासाठी हभप.श्रीमंत घुगे , हभप.साहेबा जेठे , हभप.सिद्राम सोमवसे , हभप .आप्पासाहेब जाधव महाराज , हभप.देविदास सावंत , हभप.आदिनाथ शिंदे , हभप . राजकुमार पोतदार, सौ.पोतदार ताई, सौ.मुंडेताई , कर्पेताई ह.भ.प. तानाजी महाबोले , हभप.सदाफुले महाराज , हभप.दत्तात्रय गुड , हभप .बाळू मामा सुरवसे यांच्यासह बहुसंख्य रामभक्त सत्संग बैठकीस उपस्थित होते. पुढील सत्संगाची चौथी बैठक खुदावाडी येथील रामभक्त हभप. दगडू जोडभावे सर यांच्या निवासस्थानी रविवार दि.१३ जुलै २०२५ रोजी घेण्यात येणार आहे तरी याही बैठकीस सर्व राम भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन या सत्संग बैठकीचे प्रमुख डॉ. विष्णुपंत मुंढे यांनी केलेले आहे.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या