spot_img
18.7 C
New York
Friday, August 1, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

मातेश्री जगदंबा म्हणजे मानवतेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा – आमदार प्रविण स्वामी

 

उमरगा, ता. उमरगा, ता. २३ (प्रतिनिधी) : –

प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय हे जगभरात आध्यात्मिकतेचा, शांतीचा आणि स्त्री शक्तीचा संदेश देणारे एक अद्वितीय केंद्र आहे. त्यांच्या कार्यातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडत आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या आचारविचारात शुद्धता ठेवली तर समाज निर्मळ व समृद्ध होईल. यासाठी मातेश्री जगदंबा यांच्या कार्याचे स्मरण करणे म्हणजे मानवतेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा घेणे होय असे प्रतिपादन उमरगा-लोहारा तालुक्याचे आमदार प्रविण स्वामी यांनी केले. उमरगा येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयात आयोजित मातेश्री जगदंबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त रविवारी (ता. २२) रोजी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी लोहारा-उमरगा तालुक्याचे आमदार प्रविण स्वामी, अणदुर येथील जवाहर महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. अनिता मुदकण्णा, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, अल्का मलगोंडा,

केशेगावचे कांचन मुळे, राजकुमार मुळे, नळदुर्गच्या प्रा. जयश्री घोडके, रोटरीचे उपप्रांतपाल अजित गोबारे, राधिका मिटकरी, सुंदर भालकाटे, मीरा मोटे, जळकोटे, काशिनाथ मिरगाळे, चंद्रकांत झिंगाडे, अमोल पिनाटे, अरुणा पिनाटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी माहेश्वरी तथा जगदंबा मातेश्री यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. अनिता मुदकण्णा म्हणाल्या की, जगदंबा जीनी जीवनभर सेवा समर्पण आणि प्रेम यांचे मूर्तीमंत उदाहरण जगासमोर ठेवले आहे. त्यांचे जीवन म्हणजे निस्वार्थपणे मानवतेची सेवा करण्याचा प्रेरणादायी आदर्श आपण सर्वांनी जोपासला पाहिजे. यावेळी डॉ. महेश मोटे, अल्का मलगोंडा, प्रा. जयश्री घोडके, अजित गोबारे, जळकोटे आदींनी याप्रसंगी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाचे केंद्रप्रमुख राजूभाई भालकाटे यांनी केले. सूत्रसंचालन शिल्पा क्षीरसागर तर आभार करबसप्पा ब्याळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिता मिरकले, अंकिता पाटील, श्रृती नागदे, वैष्णवी सूर्यवंशी, सुजाता तूकशेट्टी, रतन पाटील, सुमित अंकलकोटे, मल्लिनाथ कलशेट्टी, राजेश तूकशेट्टी, दिलीप हंगरगे,

निर्मला साखरे, मीरा प्रभाळकर, मधुरा पावरशेट्टी , अनिता पाटील, संध्या येवते आदींनी पुढाकार घेतला. उमरगा, मुरूम, कदेर, कंटेकुर, दाळींब, कवठा, नारंगवाडी, डीग्गी आदी गावातील बंधू-भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या. फोटो ओळ : उमरगा, ता. उमरगा येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्रात आयोजित मातेश्री जगदंबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करताना प्रविण स्वामी, अनिता मुदकण्णा, महेश मोटे, राजूभाई भालकाटे व अन्य.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या