spot_img
18.7 C
New York
Friday, August 1, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

“योगा फॉर वन अर्थ,वन हेल्थ” भावनेने धाराशिवमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

 

धाराशिव, दि.21 जून (प्रतिनिधी) :-

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज सकाळी ७ वाजता श्री.तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा प्रशासनाच्या व विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने भव्य योग सत्राचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, उपसंचालक गणपतराव मोरे,जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर, आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास, आयुष अधिकारी डॉ.गजानन परळीकर, तसेच शिक्षणाधिकारी सुधा साळुंखे यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून करण्यात आले.पतंजली योग संस्थेचे राम ढेरे यांनी मार्गदर्शन करत प्रात्यक्षिके घेतली.यावेळी योगविषयी माहिती अनुरत नागटिळक यांनी दिली.

कार्यक्रमात खो-खो वर्ल्ड कप विजेती अश्विनी शिंदे,शिवछत्रपती पुरस्कार विजेती गौरी शिंदे,आर्ट ऑफ लिव्हिंगचे विकास गाडेकर,क्रीडा भारतीच्या अलका पवार, स्काऊट गाईडचे विक्रांत देशपांडे,तालुका क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी व अक्षय बिरादार, मार्गदर्शक डिंपल ठाकरे, विश्वास खंदारे, MY भारत केंद्राचे वैभव लांडगे,साधनाताई,वैशाली उपासे यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी व ५०० हून अधिक योगप्रेमी, विद्यार्थी,युवक, युवती आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शुभांगी रोकडे यांनी केले.

जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी उपस्थितांना दररोज योगासने करण्याचे आवाहन करत सांगितले की, “योग केल्यामुळे आपण औषधांपासून मुक्त राहू शकतो व ‘One Earth, One Health’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवू शकतो.”

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांचे आभार जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी मानले.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या