जळकोट, दि.२१(मेघराज किलजे): उमरगा तालुक्यातील तुगाव येथे कृषी विभाग महाराष्ट्र शासनाच्यावतीने तुगाव गावातील
प्रगती सेंद्रिय शेतकरी गटाला सोयाबीन बियाणे व तुरीचे बियाणे वाटप करण्यात आले. यावेळी कृषी विभागाच्यावतीने बीज प्रक्रिया कशी करावी त्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. त्याचबरोबर उगवण क्षमता डेमो, माती परीक्षण याची माहिती देण्यात आली. कृषी सहाय्यक राहुल घोगरे यांनी ही शेतकऱ्यांना माहिती दिली.गाव ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्राम रोजगार सेवक बंडू ईगवे ,कृषी सखी लक्ष्मी कोकाटे हे उपस्थित होते. प्रगती सेंद्रिय शेतकरी गटाचे २१ शेतकरी सभासद आहेत.
तुगाव येथे शेतकऱ्यांना बियाणे वाटप
- Advertisement -