जळकोट, दि.२१(मेघराज किलजे): श्री कुलस्वामिनी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील क्रीडा व आरोग्य विभागामार्फत करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात ७ वाजता झाली. सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वेळेवर शाळेच्या प्रांगणात जमले. प्रारंभी प्रार्थना व राष्ट्रगीत घेण्यात आले. त्यानंतर प्राचार्य संतोष चव्हाण व कुलस्वामिनी प्राथमिक आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका आशा पवार व कुलस्वामिनी माध्यमिक आश्रम शाळेचे ज्येष्ठ शिक्षक नागेंद्र गुरव यांच्या उपस्थितीमध्ये श्री बालाजी राठोड यांनी योग दिनानिमित्त मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना योगासन करून दाखवले.
योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना विविध योगासने जसे की ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, प्राणायाम व ध्यान शिकवण्यात आले. सर्वांनी एकरुप होऊन मनापासून योगाभ्यास केला. कार्यक्रमात योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे फायदे यावरही माहिती देण्यात आली.
योगदिनाचा उद्देश म्हणजे योगा फॉर वेलनेस हे लक्षात ठेवून शाळेने विद्यार्थ्यांमध्ये योगाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. डी. एम. पांढरे, श्री. के. एस. कांबळे, श्री. बी.जी.हक्के, के.बी. कारले यांनी परिश्रम घेतले. यावेळी श्री अभिजीत चव्हाण, श्री .ए.एच. साबळे, श्री. एस. एन. दूधभाते ,श्री. बी. एस. मुखम, श्री. डी. टी. कदम , श्री. के.ऐ. ढोले, सागर चव्हाण, ,श्रीमती एस. बी. चौगुले, श्रीमती के. बी. लवंद , श्रीमती पी. एस. कुंचगे, श्रीमती अश्विनी लबडे, कुमारी मयुरी कांबळे ,अमित खारे उपस्थित होते.