जळकोट दि.२१(प्रतिनिधी ) –
जळकोट या ठिकाणी २१ जून रोजी जागतिक योग दिनाचे औचित्य साधून जागतिक योग दिवस व नीट परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केलेल्या राजलक्ष्मी मेघराज किलजे हिचा सत्कार या संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम योग गुरु नागेश स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी बसून, उभा राहून, पाटीवरती व पोटावरती असे शरीरासाठी आवश्यक आसने करून दाखवण्यात आली. त्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्याकडून करून घेण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांचे मन निरोगी राहावे. यासाठी प्राणायाम घेण्यात आले. यामध्ये अनुलोम-विलोम ध्यानधारणा याचा विद्यार्थ्यांना सराव देऊन त्याचे जीवनातील महत्त्व सांगण्यात आले. यानंतर अतिशय कठीण संघर्ष करत राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश पात्रता (नीट )परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या जळकोट येथील पत्रकार कन्या राजलक्ष्मी किलजे हिचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, संभाजीनगर व शालेय व्यवस्थापन समिती, संभाजीनगर यांच्यावतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यानंतर पत्रकार मेघराज किलजे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचे आवाहन करून निरोगी शरीरासाठी योगा तर निरोगी मनासाठी प्राणायाम अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन केले. याप्रसंगी संजय माने यांनी राजलक्ष्मी जळकोट नगरीचे नाव उज्ज्वल केल्याचे नमूद करत विद्यार्थ्यांनी तिचा आदर्श आपल्यासमोर ठेवावे असे सांगितले . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार हे होते तर प्रमुख उपस्थिती शकील मुलांनी उपाध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती, ग्राम पंचायत सदस्य संजय माने, मंगेश सुरवसे, पत्रकार, नागेश स्वामी, योग गुरु हे उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महामुनी, मुख्याध्यापिका, रेणुके , अभिवंत , इटकरी , मुरमुरे , चव्हाण , वनवे , कुडकले ,आहेरकर व श्रीकांत कदम आदि उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे निवेदन नीलकंठ इटकरी व महादेव आहेरकर यांनी केले तर आभार धनराज कुडकले यांनी मानले.