मुरुम प्रतिनिधी :-
आज आंतरराष्ट्रीय योग दिवस श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या क्रिडांगणावर मुरुम येथे अत्यंत उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.यावेळी मा मंत्री तथा लातूर भाजपा चे जिल्हाअध्यक्ष आदरणीय बसवराज जी पाटील साहेब ,धाराशिव जिल्हा मध्यवर्ती स बॅंकेचे चेअरमन मा बापुराव जी पाटील साहेब ,भाजपा चे उमरगा शहर मंडळाचे अध्यक्ष ॲड साईराज टाचले ,भाजपा मुरुम शहर मंडळाचे अध्यक्ष गणेश अंबर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थीत होते.योग ही केवळ व्यायामाची पध्दत नाही तर ती एक जीवनशैली आहे ,जी आपल्याला तणावमुक्त,निरोगी आणी सकारात्मक बनवते.योग आपल्याला शारीरीक ,मानसीक व अध्यात्मीक संतुलनाचा संदेश देतो
आजच्या दिवशी आपल्या दैनंदीन जीवनात योगाला स्थान देण्याचा संकल्प करु या आणी निरोगी जीवन जगू या..