spot_img
26.6 C
New York
Thursday, July 31, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

टपाल खात्याची नोकरी सोडून नीट परीक्षेत पत्रकार कन्येची भरारी

जळकोट / प्रतिनिधी :-

 

केंद्र सरकारच्या टपाल खात्याची नोकरी सोडून राष्ट्रीय वैद्यकीय पात्रता परीक्षेत तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील पत्रकार कन्याने उत्तुंग भरारी घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे. जळकोट येथील गेल्या ३५ वर्षापासून पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात योगदान देत असलेले पत्रकार श्री. मेघराज किलजे यांची कन्या कु. राजलक्ष्मी मेघराज किलजे हिने राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षेत ( नीट) ७२० पैकी ५६५ गुण मिळवले आहेत. लातूर येथील दयानंद महाविद्यालयातून इयत्ता बारावीत असताना २०२३ मध्ये नीटची प्रथम परीक्षा दिली होती. या परीक्षेत तिला ७२० पैकी ४८० गुण मिळाले होते. या गुणावर बीएएमएस या वैद्यकीय पदवीकेसाठी प्रवेश मिळत असताना तिने दुसऱ्यांदा नीट परीक्षा देण्याचे ठरवले. या काळात कसून अभ्यास केला. परंतु यावेळीही यशाने हुलकावणी दिली. दुसऱ्या प्रयत्नात ७२० पैकी ३६० गुण मिळाले. परंतु अपयशाने खचून न जाता एमबीबीएससाठी प्रवेश मिळवायचाच… या जिद्दीने घरी राहुन ऑनलाइनद्वारे नीटचा अभ्यास सुरू केला. दररोज दोन तास अभ्यास करत नीटमधील बारकावे शोधून सराव केला. सतत दररोज दोन तास अभ्यास व सततच्या सरावात खंड पडू न देता अभ्यास चालू ठेवला. दरम्यान या काळात केंद्र सरकारच्या भारतीय डाक विभागात कोळसुर (ता.उमरगा) येथे असिस्टंट पोस्टमास्तर या पदावर नोकरी मिळाली. परंतु केवळ दोन दिवस नोकरी करून या नोकरीचा राजीनामा दिला. मला एमबीबीएस वैद्यकीय शिक्षण घ्यायचेच आहे. या एका जिद्दीने केलेला अभ्यास यावर्षीच्या परीक्षेत कामी आला आहे.
कुठल्याही सोयी सुविधा नसताना कु. राजलक्ष्मी किलजे यांनी नीट परीक्षेत उत्तुंग भरारी घेऊन घवघवीत संपादन केले आहे.
अभ्यासात खंड पडू न देता, सततचा सराव, जिद्द, मेहनत व ध्येयाची सतत आठवण करून घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळाले आहे. राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षेत कु. राजलक्ष्मी किलजे हिने ७२० पैकी ५६५ गुण मिळवले आहेत. नीटचा पेपर यावर्षी विद्यार्थ्यांना अत्यंत कठीण गेला. परंतु राजलक्ष्मीने फिजिक्स विषयावर जास्त लक्ष देऊन मेहनत घेतली आहे. राजलक्ष्मी किलजे तिचे प्राथमिक शिक्षण जळकोट येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत तर माध्यमिक शिक्षण जळकोट येथील पार्वती कन्या प्रशाला येथे झाली आहे. अकरावी व बारावीचे शिक्षण लातूर येथील दयानंद महाविद्यालय येथे झाले आहे. विद्यार्थ्यांनी अपयशापासून धडा घेऊन संयम ठेवून अभ्यास केल्यास यश निश्चित मिळते. अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली. या घवघवीत यशाबद्दल कु. राजलक्ष्मी किलजे हिचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या