spot_img
31.1 C
New York
Thursday, June 12, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव, माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या हस्ते पूजन, भव्यदिव्य मिरवणूकीने सांगता संपन्न

 

मुरूम ता. ०८,

 

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त येथील जय मल्हार युवक मंडळाच्या वतीने रविवारी (दि.८) शहरातील प्रमुख मार्ग डॉ. आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा बसवेश्वर चौक, साठे चौक, अशोक चौक, टिळक चौक, किसान चौक, सुभाष चौक, गांधी चौक,हनुमान चौका पर्यंत अहिल्यादेवी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची वाजत-गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली.

प्रारंभी माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णांकर्ती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी सपोनि नवनाथ गाडेकर, सुधीर चव्हाण, श्रीकांत बेंडकाळे, जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष बिरू ढंगापुरे, उपाध्यक्ष राम चेंडके आदी
उपस्थित होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. पारंपारीक वाद्य ढोल वाजत – गाजत डीजेच्या तालावार नाचत मिरवणुकीची हनुमान चौकात सांगता करण्यात आली. मिरवणुकीत कर्नाटकातील मनाळी (ता. बसवकल्याण) येथून आलेल्या ढोल पथकाने पारंपरिक ढोल वाजवत मिरवणुकीची शोभा वाढवली. यशस्वितेसाठी विजय घोडके, श्रीकांत बन्ने, दिगंबर सोनटक्के, दत्ता घोडके, राहुल बन्ने, अक्षय बन्ने, गुरुनाथ घोडके, गंगाधर दूधभाते, विजय दूधभाते, बंडू बन्ने, महेश बन्ने, संतोष चेंडके, धोंडीबा बनसोडे,श्रीकांत बन्ने,अनिल जवान, अप्पू बन्ने,अपास बन्ने, आकाश गाडेकर, हनुमंत सोनटक्के, हिरगू सोनटक्के, श्याम करगले, दादा बन्ने, मारुती बन्ने, लक्ष्मण बन्ने, धोंडीबा दूधभाते, विश्वनाथ जवान, शरण घोडके, शिवा दूधभाते, राजू उजळंबे आदींनी पुढाकार घेतला. मिरवणुकीत महिला व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या