spot_img
18.7 C
New York
Friday, August 1, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

वात्सल्य सामाजिक संस्थेस IAF ISO मानांकन

 

धाराशिव न्यूज रिपोर्टर: विजय पिसे जळकोट

 

येथील वात्सल्य सामाजिक संस्थेस जिल्ह्यातील उत्कृष्ट सामाजिक संस्था हा शासनाचा पुरस्कार मिळाल्यानंतर संस्थेने आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे.संस्थेला नुकतेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे ISO हे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे हे मानांकन म्हणजे संस्थेच्या पारदर्शक कार्यपद्धतीचा,गुणवत्ता व्यवस्थापनाचा व समाजाप्रती असलेल्या निष्ठेचा जागतिक स्तरावरचा सन्मान आहे.

अवघ्या काही वर्षांपूर्वी समाजाप्रती संवेदनशील असलेल्या पाच महिलांनी विधवा भगिनींसाठी सुरू केलेल्या या कामाने आता व्यापक रूप धारण केले आहे.समाजातील दुर्लक्षित घटकांच्या विकासात विधायक,सक्रियपणे काम करणाऱ्या सामाजिक संस्थांची भूमिका महत्त्वाची असते. केंद्र शासनाच्या आकांक्षीत-मागास जिल्ह्याच्या यादीत धाराशिव चा समावेश आहे वात्सल्य संस्था मराठवाड्यात विशेषतः धाराशिव जिल्ह्यात एकल,विधवा भगिनींचे प्रश्न,वृक्ष लागवड व संवर्धन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या 26 मुलांना दत्तक घेणे, जलसंवर्धन,सेंद्रिय शेतीसाठी प्रयत्न,गो-संवर्धन,आरोग्य या विषयातील वैशिष्ट्यपूर्ण कामामुळे आपले वेगळेपण टिकवून आहे.समाजातील सुह्रदयी व्यक्तींच्या सहकार्याने 150 एकल भगिनींच्या पुनर्वसनाचे कार्य संस्थेने नुकतेच हाती घेतले आहे

ISO निरीक्षण टीमने संस्थेच्या कार्यपद्धतीचे सातत्याने निरीक्षण करून गुणवत्ता आणि प्रक्रिया यामध्ये असलेल्या उत्कृष्टतेला दाद देत IAF ISO 9001:2015 हे गौरवाचे प्रमाणपत्र प्रदान केले.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या