धाराशिव ( सतीश राठोड) :-
शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून नळदुर्ग येथील जयहिंद प्रतिष्ठानच्या वतीने ६ जून रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवावा असे आवाहन जयहिंद प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक संजय बताले यांनी केले आहे.
रक्तदान हे एक सर्वश्रेष्ठ दान आहे या दानामुळे अनेक लोकांचे प्राण वाचवले जातात त्यामुळे रक्तदान हे केवळ दान नाही तर एक जीवदान आहे ही बाब लक्षात घेऊन नळदुर्ग येथील जयहिंद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक संजय बताले यांनी पुढाकार घेऊन प्रति वर्षाप्रमाणे याहीवर्षी नळदुर्ग येथील श्री.मल्लिकार्जुन मंदिर सभागृह , चावडी चौक येथे प्रतिष्ठानच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे तरी या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून रक्तदान करावे असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक संजय बताले यांनी केले आहे.