अणदूर / प्रतिनिधी :- दि.1
तुळजापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील अणदूर येथे एसटी महामंडळाचा 77 वा वर्धापन दिन प्रवासी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहवासात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
प्रारंभी वाहतूक नियंत्रक राजकुमार चव्हाण यांनी माजी पंचायत समिती सभापती बालाजी मोकाशे, ज्येष्ठ पत्रकार राजकुमार स्वामी, चंद्रकांत हागलगुंडे, माजी सरपंच सरिताताई मोकाशे,ग्रामपंचायत सदस्य बालाजी घुगे, उमरगा वाहतूक नियंत्रक अतुल बारभाई यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना बारभाई म्हणाले की, राज्यातच नव्हे तर आशिया खंडात एसटी महामंडळाची सर्व सामान्यांसाठी सेवा ही न भूतो आहे. सर्वसामान्यांचे रक्तवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी स खऱ्या अर्थाने सहकार्याची गरज असून रात्रंदिवस सेवा देण्यासाठी कार्यरत असलेल्या हक्काच्या महामंडळास निस्वार्थ सहकार्याचे आवश्यकता असल्याची भावना यावेळी बोलताना व्यक्त केली. यावेळी बाबा तांबोळी, खंडेराव व्हणाले, सुमेश सोमवंशी, रोहित घुगे, अमोल महाबोले, आयुब अत्तर, प्रशांत मुळे, वचने पाटील, स्वच्छता दूत गायकवाड सह प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



                                    
