धाराशिव (सतीश राठोड ) :-
तुळजापूर तालुक्यातील शहापूर येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात केले होते 46 रक्तदात्यांनी रक्तदान केले .
प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास दांडगा प्रतिसाद मिळाला असून सोलापूर येथील महात्मा बसवेश्वर ब्लड सेंटरच्या डॉक्टरांनी काम पाहीले. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे ही बाब लक्षात घेऊन राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव मंडळ शहापूरच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन रक्तदान शिबिर आयोजित केले या शिबिराचे शहापूर परिसरात कौतुक होत आहे . याप्रसंगी शहापूर ग्रामपंचायतीचे सरपंच उमेश भगवान गोरे , उपसरपंच नानासाहेब पाटील, ग्रामपंचायत सदस्य भरत मोरे , बाबु जाधव सर , पोलीस पाटील बालाजी खरात सह
मंडळाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष व सदस्य उपस्थित होते .शिबिर यशस्वी करण्यासाठी राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.