spot_img
3.9 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img
spot_img

लक्ष्मीबाई प्रतिष्ठानच्या वतीने बाभळगाव येथे गुणवंतांचा सत्कार 

 

 

अणदूर प्रतिनिधी :-

तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथील लक्ष्मीबाई प्रतिष्ठानच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोकराव जाधव गुरुजी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून धाराशिव जिल्हा बालकल्याण समितीचे सदस्य तथा पत्रकार दयानंद काळुंके,प्रगतशील शेतकरी जयंत पाटील,युवा उद्योजक जितेंद्र पाटील, संजीवनी जाधव,अनिल पाटील,अंदाणी जाधव, मेघराज जाधव, सौदागर पौळ यांची प्रमुख उपस्थिती होती

यावेळी ऋतुजा गुंड, श्रध्दा चव्हाण, अभिजीत जाधव, कृष्णा पाटमासे, दिपाली जाधव,यशश्री जाधव, श्रृती पाटमासे, प्रसाद धरणे,वैभव पाटील या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला

यावेळी पत्रकार दयानंद काळुंके, सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोकराव जाधव गुरुजी, डॉ संतोष पवार यांनी दहावी,बारावी नंतर पुढे काय? बालक,पालक यांच्यातील सुसंवाद याबद्दल मार्गदर्शन केले

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ संतोष पवार यांनी केले तर आभार सोनाली जाधव यांनी मानले

यासाठी विश्वनाथ धरणे,सुरज धनवडे,श्रीकांत धरणे, योगेश धरणे, अविनाश जाधव, नवनाथ चव्हाण,बंडू जाधव,राज जगताप,दिपक जाधव यांनी पुढाकार घेतला होता

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या