spot_img
18.7 C
New York
Friday, August 1, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा गौरव करत ‘करिअर कौन्सलिंग व मार्गदर्शन’ कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न

📍 मुरूम | दि. २९ मे २०२५

रोटरी क्लब मुरूम सिटी, रोटरी क्लब कोपरगाव सेंट्रल व संजिवनी विद्यापीठ कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम दि. २९ मे २०२५ रोजी प्रतिभा निकेतन कनिष्ठ महाविद्यालय, मुरूम येथे उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटे. कमलाकर मोटे (अध्यक्ष, रोटरी क्लब मुरूम सिटी) होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. प्रा. राम हजारे (सहायक अधिव्याख्याता, संजीवनी विद्यापीठ कोपरगाव) आणि प्राचार्य डॉ. संजय अस्वले (छ. शिवाजी महाविद्यालय, उमरगा) यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना करिअर निवडीतील योग्य दिशा, अभ्यासाचे नियोजन व उद्योगक्षेत्रातील संधी यांबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

प्रमुख उपस्थितीत रोटे. सुनील राठोड (सचिव, रोटरी क्लब मुरूम सिटी), रोटे. उल्हास घुरघुरे (उपप्राचार्य, प्रतिभा निकेतन कनिष्ठ महाविद्यालय) व मा. प्रा. डॉ. रोटे आप्पासाहेब सूर्यवंशी (नवीन अध्यक्ष, रोटरी क्लब मुरूम सिटी २०२५-२६) प्रा शुभम गिरी संजीवनी विद्यापीठ कोपरगाव यांचा समावेश होता.

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने झाली. मान्यवरांच्या हस्ते ही पवित्र सुरुवात झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटे. संतोष कांबळे यांनी ओघवत्या व प्रभावी शैलीत केले, तर आभार प्रदर्शन रोटे. सुनील राठोड यांनी केले.

या कार्यक्रमात मुरूम शहर , बेळंब, आष्टा कासार, नाईकनगर येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत विविध शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व स्मृतिचिन्हे देण्यात आली. मुरूम चे भूमिपुत्र गिरीश अष्टगी यांनी माऊंट एव्हरेस्ट शिखर पार यशस्वी पार केल्याबद्दल गौरविण्यात आले त्यांनी आपले चित्तथरारक अनिभाव कथन केले.

रोटरीच्या “सेवा हेच आमचे ध्येय” या तत्त्वानुसार समाजोपयोगी उपक्रमांतून तरुणांना योग्य मार्गदर्शन करणे हेच या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट होते. यासाठी रोटरी क्लब मुरूम सिटीतील सदस्य रोटे कल्लाप्पा पाटील, रोटे डॉ आप्पासाहेब सूर्यवंशी, रोटे राजेंद्र वाकडे, रोटे भूषण पाताळे , रोटे मल्लिकार्जुन बदोले , रोटे उल्हास घुरघुरे , रोटे संतोष कांबळे, रोटे डॉ सुवर्णा पाटील , रोटे कल्लाय्या स्वामी, रोटे,प्रकाश रोडगे आदींनी केलेले योगदान निश्चितच उल्लेखनीय आहे.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या