spot_img
18.7 C
New York
Friday, August 1, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

आपलं घर येथील मंत्री मंडळाचा बालकल्याण समितीच्या वतीने सत्कार 

 

अणदूर / प्रतिनिधी :-

 

तुळजापूर तालुक्यातील आलीयाबाद येथील आपलं घर येथील बालगृहातील नवीन निवडलेल्या मंत्रीमंडळाचा सत्कार २६ मे रोजी धाराशिव बालकल्याण समीतीच्या वतीने आपलं घर येथे करण्यात आला

बालगृहातील बालकांना राज्य मंत्रीमंडळ संरचना,शिस्त, जबाबदारी, योग्य प्रशासन, निवडणूक प्रक्रिया, मुक्तपणे काम करण्याच्या पद्धती याची माहिती व्हावी म्हणून एक वर्षासाठी बालगृहात या मंत्री मंडळाची नियुक्ती होते,या वर्षी आपलं घर बालगृहात झालेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री म्हणून समर्थ स्वामी, उपमुख्यमंत्री कुणाल कांबळे, शिक्षणमंत्री शुभांगी सावंत,भोजन मंत्री विशाल सुर्यवंशी, सांस्कृतिक मंत्री आर्या चव्हाण, स्वच्छता मंत्री रेश्मा काळे, आरोग्य मंत्री गंगा मादगे,शिस्त मंत्री शामबाला नरवटे,क्रिडा मंत्री कुणाल अंगुले यांची निवड झाल्याने बालकल्याण समितीच्या वतीने या मंत्री मंडळाचा सत्कार करण्यात आला

यासाठी बालकल्याण समितीचे अध्यक्ष विजयकुमार माने, सदस्या ॲड मैना भोसले, ॲड सुजाता माळी, सदस्य दयानंद काळुंके,अणदूरचे पोलीस पाटील जावेद शेख, आपलं घर येथील व्यवस्थापक विलास वकील,अधिक्षक संदिप चवले माजी सरपंच प्रबोध कांबळे,अणदूर ग्रा पं सदस्या अनुसया कांबळे,संत तुकाराम सामाजिक संस्थेच्या सदस्या कविता देडे,अनिता काळुंके,सुरज देडे, चाईल्ड लाईनचे अभयकुमार काळे यांची प्रमुख उपस्थिती होती

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या