धाराशिव /उमरगा
भारतीय सैन्यदलाप्रति कृतज्ञता आणि सैनिकांच्या अतुलनीय शौर्याला सलाम करण्यासाठी सोमवारी उमरगा व लोहारा तालुक्याच्या समस्त देशप्रेमी व माजी सैनिक यांच्या वतीने तिरंगा यात्रा काढण्यात आली. यात्रेची सुरुवात हुतात्मा स्मारक पासून सुरू होऊन इंदिरा चौक-छत्रपती शिवाजी महाराज चौक -बाळासाहेब ठाकरे चौक – डॉ बाबासाहेब आंबेडकर ते तहसील कार्यालया जवळ समारोप करण्यात आला. यावेळी भारतमातेचा आणि सैन्याच्या तिन्ही दलांचा जयघोष करत उत्साहपूर्ण वातावरणात ही यात्रा काढण्यात आली.
देशाच्या मातीसाठी, आपल्या लेकरांसाठी, आपल्या भविष्यासाठी आपल्या प्राणांची तमा न बाळगता लढणाऱ्या भारतीय सैन्याला अभिवादन करण्याकरिता भर पावसात उमरगा व लोहारा तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक तथा असंख्य तरुण राष्ट्रीय ध्वज हाती घेऊन यात्रेमध्ये सामील झाले. या यात्रेतून उमरगेकरांच्या निस्सीम देशभक्ती आणि देशप्रेमाचे दर्शन घडून आले.
यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये माजी खासदार प्रा.रविंद्र गायकवाड, शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले, डॉ.चंद्रकांत महाजन, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, मराठवाडा युवती सेना निरीक्षक ॲड.आकांक्षा चौगुले, माजी सभापती दिग्विजय शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, जगन्नाथ पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख सचिन जाधव, भाजपा तालुकाध्यक्ष शहाजी चालुक्य आधी उपस्थित होते.



                                    
