spot_img
22.3 C
New York
Friday, August 1, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

तुळजापूरातील सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित मराठा मोफत वधू-वर परिचय स्नेहमेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद; 1500 वधू-वरांचा सहभाग

 

तुळजापूर / उमाजी गायकवाड

तुळजापूर शहरातील नळदुर्ग रोडवरील श्रीनाथ मंगल कार्यालयात रविवार दि. 25 रोजी मराठा समाजातील मुलामुलींचे लग्न जुळविणे सोपे व्हावे यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित मराठा समाजातील मोफत वधू-वर परिचय स्नेहमेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

‘वर्तमानकाळात मुले व मुली उच्चशिक्षित आहेत. लग्नासाठी त्यांच्या व पालकांच्या खूपच अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे लग्न जुळविताना आजकाल पालकांना बरेच प्रयत्न व संघर्ष करावे लागतात,मुलामुलींच्या अपेक्षा वाढल्यामुळे लवकर लग्न जमत नाही, तसेच वय वाढत जाऊन नंतर तडजोड करावी लागते, तर ही तडजोड वेळीच केली तर फारशी अडचण येणार नाही.त्या अनुषंगाने मराठा वधु-वर मेळाव्याचे आयोजन महाराष्ट्रभर करण्यात येत असून वधु वर पालकांनी लग्न जुळवितासाठी पैशाचा व्यवहार करु नये असे आवाहन
मराठा वधु-वर मेळाव्याचे संयोजन समितीचे सदस्य अशोक गायकवाड यांनी उपस्थित वधु वर व पालकांना केले.

महाराष्ट्रभर होत असलेल्या मराठा वधु -वर मेळावा आयोजनात सोशल मिडिया, व्हाट्सअप सारख्या सकल मराठा सोयरिक मंडळ,नातीगोती लग्न ग्रुप,मराठा समाज सोयरिक गृप असे महाराष्ट्रभर जिल्हा निहाय व्हाट्सअप गृप बनवून परिचय पत्राची देवाणघेवाण करीत सध्याच्या युगात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला असून, त्याचा परिणाम म्हणून सकल मराठा समाज आयोजित मराठा समाज वधु-वर मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या मेळाव्यात अनेक ऋणानुबंध जुळतील’, असा विश्वास संयोजन समितीने व्यक्त केला आहे.

या मेळाव्यात 1500 वधु-वर व पालकांनी सहभाग घेतला. यामध्ये 562 मुले व फक्त 79 मुलींचा सहभाग होता. या मेळाव्यात
मोठ्या संख्येनं मराठा समाजातील पालकांनी भाग घेतला असला तरी त्यात विक्रमी 562 मुलांचे तर मुलींचे केवळ 79 परिचय पत्र संयोजन समितीकडे जमा झाल्याने मुलींच्या टंचाईची दाहक स्थिती पुन्हा एकदा समोर आली असल्याचे दिसून आले आहे. मात्र या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तुळजापूर येथील श्रीनाथ मंगल कार्यालयात रविवार ता. 25 रोजी झालेल्या मेळाव्यास धाराशिव जिल्ह्यासह,पुणे, सोलापूर, लातूर,मुंबई, बिदर,सांगली, सातारा, कोल्हापूर, जिल्ह्यातील बार्शी,खटाव , बारामती,,शिरूर ह्या तालुक्यातील तसेच पिंपरी-चिंचवड, भोसरी येथील मराठा समाजाचे वधु-वर व पालक सहभागी झाले होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठा वधु वर मेळाव्यासाठी संयोजन समितीचे सदस्य तथा पुजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी यांनी त्यांचे स्वतःचे श्रीनाथ मंगल कार्यालय विनामूल्य उपलब्ध करुन दिले.त्याचबरोबर मेळावा यशस्वीतेसाठी ते अग्रक्रमाने सहभागी होते. त्याबद्दल संयोजन समितीच्या वतीने त्यांचा शाल, आई तुळजाभवानीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा देखील सत्काराने सन्मान करण्यात आला.

तुळजापूर येथील पुजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी यांच्या हस्ते आई तुळजाभवानी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घघाटन करण्यात आले. तसेच प्रातिनिधिक स्वरूपात वधू-वर परिचय पत्र स्वीकारून मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला.

पहिल्या सत्रात वधू-वर नोंदणी व दुसऱ्या सत्रात संयोजन समितीचे अशोक गायकवाड यांच्यासह वधू-वरांनी आपला परिचय करून दिला. मेळाव्याच्या माध्यमातून अनेक विवाह निश्चित होतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

वधू-वर मेळावे ही काळाची गरज असून सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित मेळाव्याचे कौतुक उपस्थित पालकांनी केले.

यावेळी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र भोसले, सातारा, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर,युवा नेते कृष्णा (भैय्या) रोचकरी,विक्रम पाटील, सरपंच परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा झिनत सय्यद,नरेश अमृतराव,अमर मगर, अमर हंगरगेकर,रामेश्वर नन्नवरे, प्रशांत सोंजी, अजय साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते.

मेळाव्या यशस्वीतेसाठी संयोजन पुजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी प्रा. अभिमान हंगरगेकर,अशोक गायकवाड, उमाजी गायकवाड, उत्तम (नाना) अमृतराव, नागनाथ (भाऊ)भांजी,अमोल निंबाळकर, अण्णासाहेब कदम,नवनाथ पवार,राजू तांबे,अशोक ठोंबळ,संजय शिंदे,दत्तात्रय घाडगे,अशोक चव्हाण,अर्जुन जाधव,सुहास साळुंके, हनुमंत भालेकर, गोरोबा लोंढे,राहुल जाधव, ॲड.रमेश भोसले,विश्वास मोटे,रमाकांत लोंढे यांनी परिश्रम घेतले.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या