spot_img
3.9 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img
spot_img

धाराशिवच्या नवनियुक्त पोलीस अधीक्षक रितु खोखर यांनी सहकुटुंब घेतले श्रीतुळजाभवानी देवीचे दर्शन

 

तुळजापूर / प्रतिनिधी (ता 24) :-

धाराशिव जिल्ह्याच्या नव्याने नियुक्त झालेल्या पोलीस अधीक्षक रितु खोखर यांनी आज सकाळी श्री तुळजाभवानी मंदिरात सहकुटुंब देवीचे दर्शन घेतले. धाराशिव च्या पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्तीनंतर आज पहिल्यांदाच त्यांनी तुळजापूर मंदिरास भेट दिली.
यापूर्वी रितु खोखर सांगली येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होत्या. त्यांची धाराशिव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
दर्शनावेळी तहसीलदार तथा मंदिर व्यवस्थापक अरविंद बोळंगे यांनी त्यांचे स्वागत केले. दर्शनानंतर मंदिर संस्थानच्या वतीने त्यांना श्रीतुळजाभवानी मातेची प्रतिमा, कवड्याची माळ व महावस्त्र प्रदान करून सत्कार करण्यात आला.
या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख, पोलिस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन चौधर, मंदिर संस्थानचे जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे, प्रशांत जाधव, सुरक्षा निरीक्षक ऋषिकेश पराडे तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या