spot_img
17.1 C
New York
Saturday, June 14, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

डॉ. स्नेहा सोनकाटे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

 

अणदूर / प्रतिनिधी :-

तुळजापूर तालुक्यातील आणदुर येथील इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ओबीसी नेत्या डॉक्टर स्नेहाताई सोनकाटे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. अहिल्याबाई होळकर तरुण
मंडळाच्या वतीने अणदूर येथील धनगर समाज मंदिरात इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अंजनाताई पापडे ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे अणदुर शहराध्यक्ष दीपक घोडके , अणदूर ग्रामपंचायत सदस्य गोदावरीताई गुड्ड, ज्ञानसागर क्लासेसचे संस्थापक युवराज कर्पे सर हे होते. याप्रसंगी ओबीसी नेत्या डॉक्टर स्नेहा सोनकाटे यांच्या हस्ते दहावी बोर्ड परीक्षेत नमन गणपती कांबळे यांना 99.20% तर मेंढपाळ कुटुंबातील प्रतीक्षा विश्वनाथ गळाकाटे यांना 97.40% गुण मिळवल्याबद्दल यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विक्रांत दुधाळकर, रोहन दुधाळकर, राहुल घोडके, म्हाळप्पा गळाकाटे, दत्ता गळाकाटे, राकेश दुधाळकर, ओम भालेकर, गोटू पाटील, अमोल गुडड, सुनिल मातोळकर, विशाल गुडड यासह धनगर समाज बांधवांनी परिश्रम घेतले .

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या