spot_img
23.1 C
New York
Thursday, July 31, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

डॉ.रामलिंग पुराणे यांना सामाजिक,पत्रकारिता,कार्यक्षम नेतृत्व क्षेत्रातील कर्मजीत पुरस्कार जाहीर

 

मुरूम प्रतिनिधी :-

सामाजिक कार्यकर्ते तथा बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष डॉ.रामलिंग पुराणे यांना सामाजिक बांधिलकी, कार्यक्षम नेतृत्व आणि पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक सजगतेची दखल घेऊन पुणे येथील आशुतोष डान्स स्टुडिओच्या वतीने “कर्मजीत” पुरस्कार साठी निवड करण्यात आल्याची आयोजक आशुतोष अभिजीत संकाये पाटील यांनी पत्राद्वारे कळविले आहे. सामाजिक बांधिलकी, कार्यक्षम नेतृत्व आणि पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक सजगता निर्माण करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा राज्यस्तरीय सन्मान करण्याच्या प्रेरणेने आम्ही “कर्तृत्ववान पुरस्कार सोहळा २०२५” आयोजित करत आहोत. या गौरवप्रद सोहळ्यात, समाजहितासाठी सतत कार्यरत असलेल्या आपल्या योगदानाची योग्य दखल घेत, “कर्मजीत पुरस्कार – २०२५” साठी आपली निवड करण्यात आली आहे, याची माहिती अत्यंत आनंद व सन्मानाने देत आहोत. आपण एक सक्रिय सामाजिक कार्यकर्ते, दृढ संघटनात्मक नेतृत्वकर्ते, आणि सजग पत्रकार म्हणून गेली अनेक वर्षे राष्ट्राच्या विविध भागांमध्ये समाजातील गरजू, उपेक्षित, आणि वंचित घटकांपर्यंत आवाज पोहोचवण्याचे कार्य करत आहात.
आपली संघटनात्मक धोरणांवरील उत्कृष्ट पकड, भक्कम विचारधारा, आणि सामाजिक चळवळीतून निर्माण केलेली जागरूकता ही समाजासाठी आशेचा किरण ठरली आहे. “कर्मजीत” या नावाचा अर्थच आहे आपल्या कर्तृत्वाने जीवनावर विजय मिळविणे. “कर्मजीत पुरस्कार” हा केवळ एखाद्या यशस्वी व्यक्तीचा गौरव नाही, तर तो समाजासाठी न थकता, न थांबता कार्य करणाऱ्या कर्तृत्वशील जीवनदृ‌ष्टिकोनाचा सन्मान आहे आणि या सन्मानाचे आपण योग्य अधिकारी आहात असे पत्रात म्हंटले आहे. डॉ.पुराणे यांचे सामाजिक कार्याबरोबर संघटनात्मक धोरण,पत्रकारिता क्षेत्रात पकड मजबूत आहे, पन्नासहुन अधिक आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांना न्याय मिळवून दिला आहे. त्यांचे अनेक आंदोलने राज्य आणि देश पातळीवर गाजले आहेत. डॉ.पुराणे यांना सामाजिक कार्यातील डॉक्टरेट पदवी ही प्राप्त झाली आहे. नुकतेच त्यांना अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना आतापर्यंत शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार,समाजभूषण, समाजचिंतक,समाजरत्न,कोरोना योद्धा,जननायक,लोकतंत्र के प्रहरी असे अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या