धाराशिव (प्रतिनिधी) –
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील मूळचे रहिवासी असलेले भगवान देवकते यांनी आज पर्यंत पक्षनिष्ठा ठेवत पक्ष नेतृत्वावर विश्वास ठेवून केलेल्या कामाची व त्यांच्या आजपर्यंतच्या त्यागाची दखल घेऊन त्यांना धाराशिव जिल्हा सह संपर्कप्रमुख पदी पक्षाचे सचिव श्री संजय मोरे यांच्या अधिकृत स्वाक्षरीचे निवडीचे पत्र देऊन त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या असून त्यांच्या या निवडीनंतर धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री प्रताप सरनाईक तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह वरिष्ठ स्तरावरील सर्वच नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या असून त्यांच्या या निवडीबद्दल धाराशिव जिल्ह्यात कार्यकर्त्याच्या वतीने मोठा जल्लोष साजरा करण्यात येत असून येणाऱ्या काळात त्यांच्याकडून पक्ष संघटना मजबूत करणे व पक्षाचा विस्तार करणे याची जबाबदारी राहणार असून ते आपल्या पदाला कसा न्याय देतील व पक्ष संघटन कसे मजबूत करतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे