म.बसवेश्वर जयंत्तीनिमित्त हंगरगा (नळ ) येथे व्याख्यान
धाराशिव न्युज रिपोर्टर: विजय पिसे जळकोट
बाराव्या शतकामध्ये सामाजिक समतायुग निर्माण करणारे आद्य समाज सुधारक व धर्मसुधारक जगतज्योती महात्मा बसवेश्वर हे थोर तत्त्वज्ञ , मानवधर्माची शिकवण देणारे लोककल्याणकारी सामाजिक क्रांतीचे प्रणेते होते .आपल्या विद्रोही विचार कार्यातून त्यांनी समाजातील जातीव्यवस्था , कर्मकांड व विषमतेवर प्रहार केला . त्यांचा कृतीशील विचार हा जागतिक लोकशाही प्रणाली व सामाजिक न्यायाला विस्तृत करणारा असुन त्यांच्या महान कार्यातून मानवधर्माची शिकवण मिळते . असे मत प्रेरणादायी वक्ते तथा साहित्यिक भैरवनाथ कानडे यांनी व्यक्त केले .
तुळजापूर तालुक्यातील हंगरगा नळ येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानाच्या कार्यक्रमात ” म .बसवेश्वर यांचे जीवन व कार्य ” या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अतुल कलशेट्टी होते . पुढे बोलताना कानडे म्हणाले की , समाजातील भेदभाव नष्ट व्हावा यासाठी म . बसवेश्वरांनी पुढाकार घेतला . समाजातील विषमता संपवून टाकण्याचा त्यांचा मनोदय होता .त्यांच्या क्रांतिकार्यामुळे गेली शेकडो वर्ष अपेक्षित वर्तन बदलापासून दूर असलेला समाज नव्या वळणावर उभा झाला .या महान सुधारणावादी क्रांतीकारकांचे विचार अखंडपणे मानवी कल्याणासाठी तेवत राहणारे आहेत .याप्रसंगी प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले . दरम्यान म . बसवेश्वर जयंत्ती उत्सव कमिटी हंगरगा नळ यांच्या वतीने संजय वाघोले यांनी श्री कानडे यांचा सत्कार केला . कार्यक्रमास उपसरपंच दयानंद चौगुले , संजय वाघोले ,बसवराज पाटील , प्रवीण चौगुले , अमोल वाघोले , योगेश मुदगडे , पंकज पाटील , रामेश्वर मगे ,राजेंद्र कलशेट्टी , महादेव चौगुले ,अमोल बिराजदार ,महादेव लिमशेंडे , मुख्याध्यापक मनोहर घोडके , पीयुष नवगिरे , सिद्धेश्वर वाघोले , दत्ता मुदगडे ,अनिल राजमाने , समर्थ पाटील , संतोष कलशेट्टी , चेतन पाटील , संदीप वाघोले , अजय कलशेट्टी ,शिवराज आप शेट्टी ,युवराज शिरगुरे , अविनाश पाटील , किरण चौगुले आदींसह युवक , महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पंकज पाटील यांनी केले .



                                    
