spot_img
22.3 C
New York
Friday, August 1, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

बेंबळी येथे महाराष्ट्र कामगार दिन उत्साहात साजरा

धाराशिव प्रतिनिधी –
श्री रामराव काळे कामगार संघटनेच्या वतीने बेंबळी येथे कामगार दिन उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांच्या पूजनाने झाली. अध्यक्ष श्री. नरेंद्र भिमराव वाघमारे यांनी कामगार वर्ग हा देशाचा आधारस्तंभ असल्याचे सांगितले. उपाध्यक्ष श्री. निलेश बाबासाहेब गवळी, सचिव श्री. नंदकुमार चन्नप्पा मानाळे, कोषाध्यक्ष श्री. संतोष सिद्धार्थ बनसोडे, कार्यकारी सदस्य सौ. साधना नंदकुमार मानाळे, राजकन्या तानाजी मोहिते व श्री. राजपाल प्रविण बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या